महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत गुरुवारी कोरोनाचे 8 हजार 217 नवे रुग्ण तर 49 रुग्णांचा मृत्यू - मुंबई कोरोना परिस्थिती

मुंबईत अंधेरी, कांदिवली, गोरेगाव, वांद्रे, मालाड, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर, घाटकोपर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. या विभागात सर्वाधिक कोरोना सक्रिय रुग्ण आहेत. यामुळे या विभागात कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी महापालिकेने सुरू केली आहे.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

By

Published : Apr 15, 2021, 9:20 PM IST

मुंबई - शहरात गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. महापालिका व आरोग्य विभागाच्या प्रयत्नांमुळे रुग्ण संख्या कमी होत होती. मात्र फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांत 8 ते 11 हजारांच्यावर रुग्ण आढळून येत आहेत. त्यात गेले दोन दिवस घट झाली होती. सोमवारी, मंगळवारी रुग्णसंख्येत घट झाली होती. काल 14 एप्रिलला त्यात वाढ होऊन 9 हजार 925 नवे रुग्ण आढळून आले होते. आता त्यात पुन्हा घट होऊन 8 हजार 217 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 49 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज (गुरुवारी) 10 हजार 97 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याने नव्या रुग्णापेक्षा डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे.

10 हजार 97 रुग्णांना डिस्चार्ज

मुंबईत आज (गुरुवारी) 8 हजार 217 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 5 लाख 53 हजार 159 वर पोहचला आहे. आज 49 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 12 हजार 189 वर पोहचला आहे. 10 हजार 97 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 4 लाख 54 हजार 311 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 85 हजार 494 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 42 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 91 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 1 हजार 100 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 48 लाख 01 हजार 219 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

हे विभाग हॉटस्पॉट

मुंबईत अंधेरी, कांदिवली, गोरेगाव, वांद्रे, मालाड, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर, घाटकोपर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. या विभागात सर्वाधिक कोरोना सक्रिय रुग्ण आहेत. यामुळे या विभागात कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी महापालिकेने सुरू केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details