सप्त सुरांची स्वरगामिनी
गानकोकिळा म्हटली की एकच नाव डोळ्यासमोर येते, ते म्हणजे स्वरसम्राज्ञी लता दीदी. लता मंगेशकर या सात शब्दातच संगीताची खरी जादू विसावलेली आहे. आणि फक्त महाराष्ट्रच नाही संपूर्ण जग या सुराची अनवट जादू अनुभवत आहे. कित्येक पिढ्या त्यांची गाणी ऐकत मोठ्या झाल्या आहेत. संगीताच्या या सात सुरावटींवर हुकूमत गाजवणाऱ्या स्वराज्ञीने आपले संपूर्ण आयुष्य गाण्यासाठीच वाहून घेतले. आणि तिच्या या गान तपश्चर्येला प्रेक्षकांनीही तेवढेच प्रेम केले आणि त्याची पूजा केली.
गोरी कांती, कापाळाला बारीकशी टिकली, आणि काळेभोर केस असे शांत मंगलमय भासणारे लतादीदींचे व्यक्तीमत्व एखाद्या मंदिरातील देवतेप्रमाणे भासते. लता ही मास्टर दीनानाथ मंगेशकर (Master Dinnanth Mangeshakar) यांची ही सुकन्या. २८ सप्टेंबर १९२९ मध्ये इंदौर (Indore) येथे जन्म झाला.
गाता गळा ही त्यांच्या वडिलांची देण. त्यांचे वडिल मास्टर दीनानाथ एक नामवंत गायक आणि उत्कृष्ट अभिनेते होते. त्यांनी 'मानापमान', 'रणदुदुंभी', 'पुण्यप्रभाव', 'सन्यंस्त खड्ग', 'देशकंटक', 'रामराज्य वियोग' या नाटकात त्यांनी काम केले.
लता, आशा, उषा, मीना, आणि हृदयनाथ या मंगेशकर भावंडांमध्ये लतादीदी सर्वात मोठ्या. त्यांचे नावापाठी अत्यंत रंजक कहाणी आहे. मास्टर यांनी लता मंगेशकर यांचे मूळ नाव हेमा असे ठेवले होते. पण काही वर्षांनंतर दिनानाथ यांच्या नाटकातील ‘लतिका’ या पात्रावरून त्यांनी, छोट्या हेमाचे नाव 'लता' ठेवले.
पाचव्या वर्षापासून रियाज
वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षापासून त्यांनी संगीताचे शिक्षण घेण्यास सुरूवात केली. त्या अनेक वर्षे रंगभूमीवरही कार्यरत होत्या. १९४२ मध्ये लता मंगेशकर १३ वर्षांच्या असताना हृदयाशी संबंधित आजाराने मास्टर दीनानाथांचा मृत्यू झाला आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर आली. आणि घरातील कर्ती मुलगी या नात्याने काम करणे भाग होते. वयाच्या 13 व्या वर्षी लताजींनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर १९४५ मध्ये संपूर्ण मंगेशकर कुटुंब मुंबईत आले. लता दीदींनी उस्ताद अमानत अली खान यांच्याकडून शास्त्रीय गायनाचे धडे गिरवले. त्यानंतर १९४६ मध्ये ‘आपकी सेवा में’ या सिनेमात ‘पा लागूं कर जोरी’ हे गाणे गायले.
मास्टर विनायक बनले दु:खात आधार
याचवेळेस नवयुग चित्रपट फिल्म कंपनीचे मालक आणि दीनानाथ यांचे मित्र मास्टर विनायक यांनी मंगेशकर कुटुंबाला सांभाळण्यास मदत केली. आणि लता दीदींना गायिका आणि अभिनेत्री बनवण्यासही मदत केली. 1942 मध्ये मास्टर विनायक यांनी लताजींना ‘पाहिली मंगला-गौर’ या मराठी चित्रपटात छोटी भूमिका दिली, ज्यात लतांनी एक गाणेही गायले.
पहिला मराठी चित्रपट 'किती हसाल’
वयाच्या 13 व्या वर्षी लताजींनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि तेव्हापासून ती आपल्या भारतीय सिनेमाला आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करत आहेत. लता यांनी 1942 मध्ये मराठी चित्रपट ‘किती हसाल’ साठी “नाचू या ना खेडे सारी, मनी हौस भारी” हे पहिले गाणे गायले. हे गाणे सदाशिवराव नेवरेकर यांनी संगीतबद्ध केले होते. परंतु, चित्रपटाचे संपादन करताना हे गाणे काढण्यात आले.
असा सुरू झाला संगीताचा प्रवास
संगीत दिग्दर्शक गुलाम हैदर यांनी ‘मजबूर’ या सिनेमातील ‘दिल मेरा तोडा, कहीं का ना छोडा’ हे गाणे गायला सांगितले. हे गाणे बऱ्यापैकी लोकप्रिय झाले. दीदींनी एका मुलाखतीत गुलाम हैदर यांना आपले ‘गॉडफादर’ असल्याचे म्हटले होते.
१००० जास्त हिंदी चित्रपटात केले गायन
आजपर्यंतच्या कारकीर्दीत लतादीदींनी ७ दशकांमध्ये १००० हून अधिक हिंदी चित्रपटांना आपला आवाज दिला आहे. तर ३६ हून अधिक भाषांमध्ये पार्श्वगायन केले आहे. २००१ मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याशिवाय, १९६९ मध्ये ‘पद्मभूषण’, १९८९ मध्ये ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ आणि १९९९ मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले होते.
लतादीदींची काही लोकप्रिय गाणी
1) प्यार किया तो डरना क्या (मुघल ए आझम)
2) कहीन जीप जले कहीन दिल (बीस साल बाद)
3) अल्लाह तेरो नाम (जयदेव)
4) बिंदीया चमकेगी (दो रास्ते)
5) चलते चलते (पाकीझा)
6) सत्यम शिवम सुंदरम (सत्यम शिवम सुंदरम)
7)कुछ ना कहो ( 1942 अ लव्ह स्टोरी)
8) ए दिल ए नादान (रझिया सुलतान)
लता दीदींनी मधुबालापासून ते प्रिटी झिंटापर्यंत अनेक अभिनेत्रींना आवाज दिला. त्यातील निवडक काही अभिनेत्री आणि त्यांचे हीट झालेले चित्रपट
1) मधुबाला - प्यार किया तो डरना, आएगा आनेवाला, प्यार किया तो डरना क्या
2) मीना कुमारी - परिणीता, साहेब बिवी और गुलाम
3) नर्गिस - मदर इंडिया, छोरी - छोरी, आन, श्री 420
4) नूतन - सरस्वतीचंद्र, बंदिना, तेरे घर के सामने
5) वैजयंतीमाला - नया जोर, नागीन, राज तिलक
6) वहीदा रेहमान - गाईड, तिसरी कसम, खामोशी
सर्वोच्च पुरस्कार
1) भारतरत्न ( 2001)
2) पद्मभूषण (1969)
3) पद्मविभूषण (1999)
4) दादा साहेब फाळके पुरस्कार (1989)
5) राष्ट्रीय पुरस्कार बिती ना बिताई रैना गाण्यासाठी (1972)
आवडत्या गोष्टी
1) लेखक - खलील, जिब्रान, चेकोव्ह, टॉलस्टॉय
2) गायक - उस्ताद बडे गुलाम अली, के. एल. सहगल, नूरजहाँ
3) चित्रपट - पडोसन, गॉन विथ द विंड, लाईमलाईट, टायटॅनिक
4) संगीतकार - मदन मोहन, चौधरी, जयदेव
5) दिग्दर्शक - बिमल रॉय, सत्यजीत रे, गुरू दत्त
हेही वाचा -Lata Mangeshkar Passed Away : लता मंगेशकर यांचे निधन, ब्रीच कँडी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास