मुंबई- गानसम्राज्ञी लता मंगेशकर ( Lata Mangeshkar ) यांच्या प्रकृतीत किरकोळ सुधारणा झाली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांचा व्हेंटिलेटर काढण्यात आला होता. त्यांना अति दक्षता विभागात ( ICU ) निरीक्षणाखाली ठेवले जाईल, अशी माहिती ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉ. प्रतित समदानी यांनी दिली आहे.
Lata Mangeshkar : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा - रुग्णालय प्रशासन - ब्रीच कँडी रुग्णालय
गानसम्राज्ञी लता मंगेशकर ( Lata Mangeshkar ) यांच्या प्रकृतीत किरकोळ सुधारणा झाली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांचा व्हेंटिलेटर काढण्यात आला होता. त्यांना अति दक्षता विभागात ( ICU ) निरीक्षणाखाली ठेवले जाईल, अशी माहिती ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉ. प्रतित समदानी यांनी दिली.
लता मंगेशकर यांना कोरोनामुळे न्युमोनियाचीही लागण झाल्या निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. न्युमोनिया झाल्यामुळे त्यांना अति दक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. उपचारास त्या उत्तम प्रतिसाद देत असल्यामुळे त्यांच्या प्रकृतीत दिवसेंदिवस सुधारणा होत आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे त्यांचा व्हेटिलेटर दोन दिवसांपूर्वी काढण्यात आला होता. मात्र, त्यांना अद्याप अति दक्षता विभागातच ठेवण्यात आले असून वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी त्यांचे निरीक्षण करत आहेत.