महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Lata Mangeshkar Passes Away : गानकोकिळेच्या निधनानंतर मनोरंजन क्षेत्रावर शोककळा - लता मंगेशकर बॉलिवूड प्रतिक्रिया

Lata Mangeshkar
Lata Mangeshkar

By

Published : Feb 6, 2022, 11:42 AM IST

Updated : Feb 6, 2022, 2:36 PM IST

14:34 February 06

त्यांच्यासोबत गाणी करणे हे माझे भाग्य

संगतीकार ए आर रहमान यांनी लता मंगेशकर यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त करत त्यांच्या सारखे कोणी आयकॉन नसल्याचे म्हटलं. त्यांच्या जाण्याने पोकळी कायम राहणार आहे. लता दीदींचा फोटो पाहून मला प्रेरणा मिळायची. त्यांच्यासोबत काही गाणी रेकॉर्ड करणे आमचे भाग्य होते, असेही त्यांनी सांगितले.

13:48 February 06

६ फेब्रुवारी काळा दिवस

अभिनेत्या हेमा मालिनी यांनी 6 फेब्रुवारी हा आपल्यासाठी काळा दिवस आहे, असे म्हटले आहे. ज्या दिग्गजांनी आपल्याला गाण्यांचा खजिना दिला आहे, त्या लताजी आपल्या सोडून गेल्या आहे. ही आमची वैयक्तिक हानी झाली आहे.

13:40 February 06

"संगीताची दुनिया पोरखी झाली"

संगीताची दुनिया पोरखी झाली. लहापनापासून लता मंगेशकर यांचा सुरांचा सहवास प्रत्येक क्षणी साथ देतोय आणि देत राहील, अशा शब्दांत जेष्ठ गायक राहुल देशपांडे यांनी शोक व्यक्त केला.

13:32 February 06

गीतकार संतोष आनंद यांची लता मंगेशकरांना श्रद्धांजली

गीतकार संतोष आनंद लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी ते एक प्यार का नगमा या गाण्याचे स्मरण करत भारावून जातात.

13:30 February 06

लता दीदी फायटर होत्या

निसर्गाने आपले काम केले पण लतादीदी या फायटर होत्या, त्यांच्या आयुष्यात ज्या पद्धतीने त्यांनी विपरीत परिस्थितीशी लढल्या त्याच पद्धतीने त्यांनी आजाराशी सुद्धा शेवटपर्यंत लढा दिला. त्यांना माझा सलाम आहे, अश्या शब्दांत विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनी लता दीदीच्या निधनानंतर प्रतिक्रिया व्यक्त केली.

13:06 February 06

अभिनेता नाना पाटेकर यांनी भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अभिनेता नाना पाटेकर यांनी भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

13:02 February 06

मागे सोडली असंख्य अविस्मरणीय गाणी

तुम्ही मागे सोडली असंख्य अविस्मरणीय गाणी, आठवणी, जी कायम हृदयात राहतील, अशी भावना अभिनेत्री सोनाली बेंद्रे हीने व्यक्त केली.

12:56 February 06

"संगीत विश्वातील एक सुवर्णकाळ खऱ्या अर्थाने संपला"

संगीत विश्वातील एक सुवर्णकाळ खऱ्या अर्थाने संपला!! लताजी तुमची आठवण आम्हा लाखो लोकांना आणि आमच्या नंतर येणाऱ्या पिढ्यांना असेल, अशी श्रद्धांजली मनोज वाजपयी यांनी लता मंगेशकर यांना वाहिली आहे.

12:31 February 06

लता मंगेशकर यांचे संगीत हे जीवनाचा अविभाज्य घटक

भारतरत्न लता मंगेशकर यांचे संगीत ऐकतच आमची, आमच्या आधीची व नंतरच्या पिढ्या मोठ्या झाल्या. त्यांचे संगीत हे जीवनाचा अविभाज्य घटक होते. माझे वडील भारतरत्न पं. भीमसेन जोशी व त्यांचा ४० च्या दशकापासून परिचय होता. तेव्हा दोघांचाही संघर्षाचा काळ होता. लता मंगेशकर यांनी त्यानंतर त्यांचे अनेक कार्यक्रम आयोजित केले. त्या आमच्या घरी येत. त्यांच्या पुणे, मुंबई इथल्या घरी जाण्याचे भाग्य मला लाभले. स्वरांची अचूकता, गोडवा, शब्दांचे उच्चारण आणि भावसंगीताचे गायन कसे असावे, याच्या त्या कुलगुरू होत्या. त्यांच्या संगीतामुळे अनेक पिढ्यांचे कान घडले. माझ्या व कुटुंबियांच्या वतीने गानकोकिळा लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशी भावना श्रीनिवास जोशी यांनी व्यक्त केली आहे.

12:27 February 06

"...आजच्या दिवशी वर्तमान दुर्दैवी ठरतो आणि इतिहास वैभवशाली होतो"

"आजचा हाच तो दिवस ज्या दिवशी वर्तमान दुर्दैवी ठरतो आणि इतिहास वैभवशाली होतो! आपण सर्वच जण अतिशय भाग्यवान आहोत, कारण आपण त्याच काळात पृथ्वीतलावर श्वास घेतला आहे ज्या काळात दीदींनी श्वास घेतला. आपण वर गेल्यावर हीच आपली ओळख असणार आहे. ॐ शांती!," अशा शब्दांत अवधुत गुप्ते यांनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

12:07 February 06

"...असा आवाज कसा विसरता येईल," अभिनेता अक्षय कुमारने व्यक्त केला शोक

असा आवाज कसा विसरता येईल, अशा शब्दांत अभिनेता अक्षय कुमार याने शोक व्यक्त केला आहे. मेरी आवाज ही पहले हैं, गर याद हरे... असा आवाज कसा विसरता येईल, लता मंगेशकर यांच्या निधनाने खूप दु:ख झाले आहे. ओम शांती

11:50 February 06

त्यांनी आपल्या मागे गाण्यांचा मोठा वारसा ठेवला - बोनी कपूर

फिल्म प्रोड्यूसर बोनी कपूर यांनी लता मंगेशकर यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी आपल्या मागे गाण्यांचा मोठा वारसा मागे ठेवला आहे. जो येणाऱ्या पिढ्यांसाठी अनमोल असेल. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.

11:16 February 06

Lata Mangeshkar Passes Away : "विश्वास बसत नाही की तूम्ही..." अभिनेते धर्मेंद्र भावूक

गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचे आज निधन झाले आहे. त्या 92 वर्षांच्या होत्या. मागील काही दिवसांपासून प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. पण, आज सकाळी उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. लतादीदींच्या निधनामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. अभिनेते धमेंद्र देओल यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. "संपूर्ण जग दुःखी आहे. विश्वास बसत नाही की तुम्ही आम्हाल सोडून गेलात. आम्हाला तुमची आठवण येत राहिल लताजी, तुमच्या आत्म्याला शांती लाभो," असे त्यांनी म्हटलं.

Last Updated : Feb 6, 2022, 2:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details