मुंबई - गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar Health Update) या गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. माझे डॉ. प्रतित सामदानी यांच्याशी बोलणे झाले आहे. याआधी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आता त्यांच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होत असल्याने व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले होते. व आता फक्त ऑक्सिजनच द्यावा लागत आहे. त्या उपचारांना प्रतिसाद देत असल्याचेही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
लता मंगेशकर यांना कोरोनामुळे न्युमोनियाचीही लागण झाल्या निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. न्युमोनिया झाल्यामुळे त्यांना अति दक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. उपचारास त्या उत्तम प्रतिसाद देत असल्यामुळे त्यांच्या प्रकृतीत दिवसेंदिवस सुधारणा होत आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे त्यांचा व्हेटिलेटर दोन दिवसांपूर्वी काढण्यात आला होता. मात्र, त्यांना अद्याप अति दक्षता विभागातच ठेवण्यात आले असून वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी त्यांचे निरीक्षण करत आहेत.