मुंबई - भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची प्रकृती खालावली होती. त्यांना त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ( Lata Mangeshkar On The Ventilator ) ठेवण्यात आले होते. आता लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती येत आहे. त्या उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे डॉक्टरांंनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयामध्ये त्या उपचार घेत आहेत. दिदींची तब्येतीत हळूहळू सुधारणा होत असल्याने काही दिवसांपूर्वी त्यांना व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले होते. पण प्रकृती पुन्हा खालवत असल्याने आज त्यांना पुन्हा व्हेंटिलेटर सपोर्ट देण्यात आला आहे.
हॉस्पिलटमध्ये जाऊन अनेकांनी केली लतादीदींच्या प्रकृतीची विचारपूस
लता मंगेशकर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आशा भोसले हॉस्पिटलमध्ये आल्या आहेत. लतादीदींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करते, असे आशा भोसले म्हणाल्या. तर रश्मी ठाकरे, सुप्रिया सुळे, मंगल प्रभात लोढा, पियुष गोयल यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन लतादीदींच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली.
आठवड्यापूर्वीच झाल्या कोरोनामुक्त
लता दीदींना कोरोना आणि न्यूमोनिया झाला होता, मात्र आठवडाभरापूर्वीच त्या कोरोनामुक्त झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची विशेष काळजी घेणं गरजेचं असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. याआधीही नोव्हेंबर 2019 मध्ये लतादीदींना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांना न्युमोनियाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांना 28 दिवसांनी डिस्चार्ज देण्यात आला होता.