महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यात दोन दिवसात ६२ कोटी ५५ लाख रुपयांची मद्य विक्री

राज्यात अनेक दिवसांपासून लॉकडाउनमुळे मद्य विक्री होत नसल्यामुळे करोडो रुपयांचे नुकसान महसूल रुपात सरकारला झाले. मद्यपींनी मद्य विक्रीची परवानगी देताच दोन दिवसात तब्बल ६२ कोटी ५५ लाख रुपयांचे मद्य खरेदी केले आहे.

liquor shopes
liquor shopes

By

Published : May 6, 2020, 7:39 AM IST

मुंबई - राज्यासह देशात कोरोनाचा कहर पाहता महाराष्ट्र राज्याला सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाऊनमुळे मद्यपींचे हाल होत होते, पण सोमवारपासून मद्यपीना राज्य सरकारने दिलासा देताच. राज्यात सर्वत्र जणू मद्यपींचा जनसागरच उसळल्याचे चित्र पहायला मिळाले. दोन दिवसातच मद्याची दुकानं सुरू झाल्याने ६२ कोटी ५५ लाख रुपयांची मद्याची खरेदी मद्यपीनी केली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे.

राज्यात अनेक दिवसांपासून लॉकडाउनमुळे मद्य विक्री होत नसल्यामुळे करोडो रुपयांचे नुकसान महसूल रुपात सरकारला झाले. मद्यपींनी मद्य विक्रीची परवानगी देताच दोन दिवसात तब्बल ६२ कोटी ५५ लाख रुपयांचे मद्य खरेदी केले आहे.

राज्यातील मद्यप्रेमीनी सोमवार आणि मंगळावर या दोन दिवसात १६.१० लाख लिटर मद्य घशाखाली रिचवली असल्याची अधिकृत आकडेवारी राज्याच्या उत्पादन शुल्क आयुक्त कार्यालयाने दिली आहे. मद्य विक्रीतून राज्याला कर स्वरुपात मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होतो. गेल्या 22 मार्चपासून राज्यात मद्य विक्री बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे 3 में पर्यंत राज्यात कुठल्याही प्रकारचे मद्य विक्री शॉप सुरु नसल्याने राज्यातील मद्यप्रेमींची मोठी अड़चन झाली होती. परंतु लॉकडाऊन 3 मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असलेल्या क्षेत्रात काही प्रमाणात म्हणजेच केवळ मद्य विक्री करणाऱ्या अधिकृत परवाना असलेल्या शॉपला मद्य विक्री करण्याची मंजूरी राज्य सरकारने दिली. या निर्णयामुळे कोरोनाच्या भीतीने घरात बसलेल्या मद्यप्रेमींना चांगलाच आनंद झाला.

सोमवारी आणि मंगळवारी राज्यात सर्वत्र मद्य विक्री करणारे शॉप उघडण्या आधीच मोठ मोठ्या रांगा मद्यपींनी लावलेल्या पहायला मिळाल्या. यामुळे काहीं भागात पोलिसांनी परिस्थिती हातात ठेवण्यासाठी लाठीचार्ज केला. तर काही शहरात आणि जिल्ह्यात स्थानिक निर्णय अधिकाऱ्यांनी मद्य विक्रीची परवानगी नाकारली. तरी सुद्धा राज्यातील एकूण 10822 परवाना मद्य शॉप पैकी 3543 मद्य विक्री शॉप राज्यभरात सुरू केले.

यात देशी मद्य व् किरकोळ विक्री दुकाने 1111, वाईन शॉप 718, बियर शॉप 1713, फ़क्त वाईन विक्री करणारे 1 या मद्य विक्री करणाऱ्या शॉप चा समावेश आहे. 36 जिल्ह्यापैकी चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली हे कोरडे जिल्हे वगळता उर्वरित 33 जिल्ह्यात मद्यविक्रीची परवानगी राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली. मात्र, यात सोलापुर, सतारा, औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, नागपुर या जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने मद्य विक्री करण्यास नकार दिला. तर मद्यप्रेमींची गर्दी उसळल्याने आता मुंबई, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात मद्य विक्री बंद करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details