मुंबई -'अयोध्या' प्रकरणी शनिवारी सकाळी साडेदहा वाजता सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील वेगवेगळ्या परिसरामध्ये पोलिस बंदोबस्त करण्यात आलेला आहे.
'अयोध्या' प्रकरणी निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट पोलीस बंदोबस्त - मुंबईत कडेकोट पोलीस बंदोबस्त
अयोध्या प्रकरणी शनिवारी सकाळी साडेदहा वाजता सुप्रीम कोर्ट देणार निर्णय.. मुंबई शहरात 40 हजारहुन मोठा पोलिस बंदोबस्त..
हेही वाचा... जातीय व धार्मिक सलोख्याची परंपरा अबाधित ठेवूयात - पोलीस अधीक्षक तेजस्वीनी सातपुते
केंद्राकडून राज्य सरकारला आयोध्या निकाल प्रकरणी सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात 40 हजारहुन मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. शहर पोलिसांबरोबर एसआरपी, आरसीएफ आणि राखीव पोलीस बळाचा वापर करण्यात येत आहे. तसेच फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटरसारख्या सोशल मिडीयावर अयोध्या निकालासंबंधी पोस्ट करु नये. अशाप्रकारे कोणतेही कृत्य झाल्यास त्यातून कायदा व सुव्यवस्था धोक्यात येवू शकते. या पार्श्वभूमीवर विशेष दक्षता घेण्यात येत आहे.