महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 9, 2019, 7:52 AM IST

Updated : Nov 9, 2019, 10:34 AM IST

ETV Bharat / city

मुंबईत ४० हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, सोशल मीडियावर करडी नजर

अयोध्या प्रकरणी शनिवारी सकाळी साडेदहा वाजता सुप्रीम कोर्ट निर्णय देणार आहे. या मुळे मुंबईसह राज्यातील वेगवेगळ्या परिसरामध्ये मोठा पोलिस बंदबस्त ठेवण्यात आला आहे.

अयोध्या निकाल प्रकरणी मुंबईत मोठा पोलीस बंदोबस्त

मुंबई -अयोध्या प्रकरणी शनिवारी सकाळी साडेदहा वाजता सुप्रीम कोर्ट निर्णय देणार आहे. याला अनुसरून मुंबईसह राज्यातील वेगवेगळ्या परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला आहे. या अगोदरच केंद्राकडून राज्य सरकारला आयोध्या निकाल प्रकरणी सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात 40,000 हुन मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. त्याबरोबरच एस आर पी, आर सी एफ, राखीव पोलीस बळाचा वापर करण्यात येणार आहे.

अयोध्या निकाल प्रकरणी मुंबईत मोठा पोलीस बंदोबस्त

त्याबरोबरच सोशल माध्यमांवर ही पोलिसांची करडी नजर असणार आहे. मुंबई शहरात असलेल्या पाच हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून सुद्धा परस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांकडून वेगवेगळ्या समाजाच्या प्रतिनिधींशी चर्चा करून निकालाच्या दिवशी संयम बाळगावा असे आवाहन केले जात आहे. यादरम्यान कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, जर अशा गोष्टी पसरवल्या जात असतील तर त्याची सूचना तात्काळ पोलिसांना द्यावी असे आव्हान पोलिसांनी केल आहे.

Last Updated : Nov 9, 2019, 10:34 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details