महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

बाबूलनाथ जंक्शनवरील मातीचा भाग खचला, आयुक्त करणार पाहणी - heavy rain in mumbai

शहरात काल बुधवारी पडलेल्या मुसळधार पावसादरम्यान सखल भागांत पाणी साचले होते. या दरम्यान बाबुलनाथ जंक्शन नजिक असणाऱ्या केम्स कॉर्नर परिसरातील उतारावरचा काही भाग खचला.

landslides in mumbai
बाबूलनाथ जंक्शनवरील मातीचा भाग खचला, आयुक्त करणार पहाणी

By

Published : Aug 6, 2020, 12:01 PM IST

मुंबई - शहरात काल बुधवारी पडलेल्या मुसळधार पावसादरम्यान सखल भागांत पाणी साचले होते. या दरम्यान बाबुलनाथ जंक्शन नजीक असणाऱ्या केम्स कॉर्नर परिसरातील उतारावरचा काही भाग खचला. या विभागातून व्हीआयपींची वर्दळ असल्याने पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल थोड्याच वेळात पहाणी करणार आहेत.

संपूर्ण शहरात काल मुसळधार पाऊस पडला. या पावसादरम्यान मुंबईतील सखल भागासह उच्चभ्रू वस्ती असलेल्या मंत्रालय, पेडर रोड, बाबूलनाथ आदी विभागातही पाणी साचले होते. मुसळधार पावसामुळे बाबुलनाथ जंक्शन नजीक असणाऱ्या केम्स कॉर्नर परिसरातील उतारावरची माती खचली आहे. या भागात उच्चभ्रू लोक वास्तव्यास आहेत. अनेक व्हीआयपींची या रस्त्यावरून ये-जा सुरू असते. यामुळे याची दखल पालिका आयुक्तांनी घेतली असून ते थोड्याच वेळात या ठिकाणाची पहाणी करणार आहेत.

कालच कांदिवली येथील टाइम्स ऑफ इंडिया जवळील डोंगराचा काही भागही कोसळला होता. त्यानंतर आता बाबुलनाख जंक्शन परिसरातही जमीन खचली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details