मुंबई - कुर्ला येथील नाईक नगर सोसायटीमधील डी विंग कोसळून (Kurla Building Collapse) 19 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ( Police ) इमारतीमधील घरमालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान आज ही ढिगाऱ्याखाली कोणी अडकले आहे का? याचा शोध घेतला जात असून बाजूच्या धोकादायक इमारती पाडण्याचे काम सुरु आहे.
नेहरू नगर पोलिस ठाणे हद्दीतील नाईक नगर को- ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी नेहरू नगर कुर्ला पूर्व मुंबई ही तळ अधिक तीन माळ्याची इमारत रात्री 11:30 वाजेच्या सुमारास कोसळली. सदर अपघाता दरम्यान एकूण 19 रहिवाशांचा मृत्यू व 15 जण जखमी झाले आहेत. ही इमारत राहण्यास धोकादायक असल्याचे महानगरपालिका यांनी यापूर्वी घोषित केले होते. तरीदेखील घर मालक व इतर अनोळखी इसमाने भाडेकरू इसमांना राहण्यास दिली व त्यांचे मृत्यूस कारणीभूत झाले आहेत. यासाठी रजनी राठोड, किशोर नारायण चव्हाण, बाळकृष्ण राठोड, व इतर घर मालक तसेच दिलीप विश्वास यांचे विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.