महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'ते साहित्य पोर्नोग्राफिक नाही' राज कुंद्रा यांचे हायकोर्टात अटकेला आव्हान - शिल्पा शेट्टी

मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करून कुंद्रा यांनी अटकेच्या कारवाईलाच आव्हान दिले आहे. त्यांच्यावरील आरोपांशी संबंधित व्हिडिओ हे "कामुक" म्हणून गणले जाऊ शकतात मात्र त्यातून कोणतेही "स्पष्ट लैंगिक कृत्य" दाखविले जात नाही असा युक्तिवाद कुंद्रा यांनी याचिकेत केला आहे.

'ते साहित्य पोर्नोग्राफिक नाही' राज कुंद्रा यांचे हायकोर्टात अटकेला आव्हान
'ते साहित्य पोर्नोग्राफिक नाही' राज कुंद्रा यांचे हायकोर्टात अटकेला आव्हान

By

Published : Jul 23, 2021, 6:13 PM IST

मुंबई : पोर्नोग्राफी प्रकरणी पोलीस कोठडीत असलेले व्यावसायिक राज कुंद्रा यांनी आता अटकेविरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करून कुंद्रा यांनी अटकेच्या कारवाईलाच आव्हान दिले आहे. त्यांच्यावरील आरोपांशी संबंधित व्हिडिओ हे "कामुक" म्हणून गणले जाऊ शकतात मात्र त्यातून कोणतेही "स्पष्ट लैंगिक कृत्य" दाखविले जात नाही असा युक्तिवाद कुंद्रा यांनी याचिकेत केला आहे.

'ते साहित्य पोर्नोग्राफिक नाही'

आपल्यावरील आरोपांशी संबंधित साहित्य पोर्नोग्राफीक असल्याचा दावा पोलीस करत आहेत, मात्र त्यातून कोणतेही "स्पष्ट लैंगिक कृत्य" किंवा "संभोग" दाखविला जात नाही. मात्र यातील छोट्या चित्रफितींतून कामुकता दाखविली जाते असे कुंद्रा यांनी याचिकेत म्हटले आहे. त्यामुळे यातून आयटी कायद्यातील कलम 67अ चा भंग होत नाही असे कुंद्रा यांनी याचिकेतून म्हटले आहे.

कुंद्रा यांना 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

पोर्नोग्राफी तयार करून ते काही अॅपच्या माध्यमातून प्रसारित करण्याच्या प्रकरणात राज कुंद्रा (45) यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी रात्री अटक केली होती. मंगळवारी कुंद्रा यांना न्यायालयात दाखल केल्यानंतर त्यांना 23 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आत याची मुदत 27 जुलैपर्यंत वाढवली आहे.

शिल्पा शेट्टीच्या घरी पोलिसांचे पथक

पोर्नोग्राफी प्रकरणात शुक्रवारी शिल्पा शेट्टीच्या घरी मुंबई पोलिसांची एक टीम बिजनेसमन राज कुंद्रा यांना घेऊन दाखल झाली आहे. पोलिसांची टीम चौकशी व राज कुंद्राविरोधात पुरावे गोळा करण्यासाठी शिल्पाच्या घरी दाखल झाली आहे. दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टीने अश्लील फिल्म प्रकरणात पती राज कुंद्राला झालेल्या अटकेनंतर सध्याचा काळ आव्हानांचा सामना करण्याचा असल्याचे म्हटले आहे. शिल्पा म्हणाली की, जीवनात अनेक प्रकारच्या आव्हानांचा सामना केला असून या प्रकरणाचाही ती धैर्याने सामना करेल.

हेही वाचा -पोर्नोग्राफी प्रकरण : शिल्पा शेट्टीच्या घरी पोहोचले मुंबई पोलीस..अभिनेत्रीने पहिल्यांदाच सोडले मौन, म्हणाली..

ABOUT THE AUTHOR

...view details