महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sushant Singh Rajput Death : सुशांत सिंह मृत्यूनंतर समोर आलेल्या ड्रग प्रकरणातील आरोपींकडून न्यायालयात दोषमुक्तीसाठी अर्ज - Sushant Singh Rajput death

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत ( Bollywood actor Sushant Singh Rajput ) याच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या ड्रग्स प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून ( Narcotics Control Bureau ) चौकशी केली जात होती. याप्रकरणी NCB ने रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक आणि अन्य काही जणांना मुख्य आरोपी ठरवले होते. या प्रकरणातील नियमित सुनावणी आज पार पडली या प्रकरणातील आरोपी असलेले धर्मा प्रोडक्शनचे डायरेक्टर क्षितिज प्रसाद यांनी सुनावणीदरम्यान दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केला आहे.

Sushant Singh Rajput
सुशांतसिंह राजपूत

By

Published : Jul 12, 2022, 8:07 PM IST

मुंबई -बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर ( Bollywood actor Sushant Singh Rajput death ) समोर आलेल्या ड्रग्स प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून ( Narcotics Control Bureau ) चौकशी केली जात होती. याप्रकरणी NCB ने रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक आणि अन्य काही जणांना मुख्य आरोपी ठरवले होते. या प्रकरणातील नियमित सुनावणी आज पार पडली या प्रकरणातील आरोपी असलेले धर्मा प्रोडक्शनचे डायरेक्टर क्षितिज प्रसाद यांनी सुनावणीदरम्यान दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केला आहे. यापूर्वी देखील या प्रकरणातील तीन आरोपींनी अर्ज दाखल केले ( three accused filed application ) होते.



पुढील सुनावणी 27 जुलै रोजी -याप्रकरणी एनसबीने अभिनेत्री रिया तिचा भाऊ शौविक आणि अन्य आरोपींविरोधात विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. एनसीबीने रिया आणि इतरांवर सुशांतसिंह राजपूतसाठी ड्रग्ज खरेदी केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात आज सुनावणी पार पडली आहे आता या प्रकरणात पुढील सुनावणी 27 जुलै रोजी होणार आहे.


आरोपींकडून ड्रग्सचा वापर -विशेष सरकारी वकील अतुल सरपंदे यांनी आरोपपत्रातील सर्व आरोपींवर आरोप निश्चित केल्याचे सांगितले. आरोपपत्र दाखल करताना त्यांनी म्हटले आहे की रिया चक्रवर्ती आणि शौविक यांनी ड्रग्सचा वापर केला आणि सुशांतसिंहसाठी त्यांनी ते खरेदीही केले. न्यायालयाकडून सर्व आरोपींवर आरोप निश्चित केले जाणार होते परंतु काही आरोपींनी दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केल्याने तसे होऊ शकले नाही असेही त्यांनी म्हटले आहे.



सीबीआयकडून तपास सुरू -सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतरसमोर आलेल्या ड्रग प्रकरणात रिया चक्रवर्तीला सप्टेंबर २०२० मध्ये अटक करण्यात आली होती. जवळपास महिनाभर ती जेलमध्ये होती. त्यानंतर रियाला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. अभिनेता सुशांतसिंह राजपूत १४ जून २०२० रोजी त्याच्या मुंबईतल राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआय चौकशी करत होती पण ही एजन्सी देखील कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचली नाही आहे.

हेही वाचा -

ABOUT THE AUTHOR

...view details