मुंबई: शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठल्यानंतर राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेनेचे नेते माजी आमदार कृष्णा हेगडे Krishna Hegde यांनीही निवडणूक आयोगाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. आगामी अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने षडयंत्र आखले आहे. त्याचा सामना करू आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जिंकू असा, विश्वास व्यक्त केला आहे.
Krishna Hegde: केंद्र सरकारच्या षडयंत्राचा सामना करू आणि जिंकू; कृष्णा हेगडे यांचा विश्वास
Krishna Hegde: शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठल्यानंतर राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेनेचे नेते माजी आमदार कृष्णा हेगडे Krishna Hegde यांनीही निवडणूक आयोगाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. आगामी अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने षडयंत्र आखले आहे. त्याचा सामना करू आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जिंकू असा, विश्वास व्यक्त केला आहे.
माजी आमदार कृष्णा हेगडे म्हणाले केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह वापरण्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला बंदी घातली आहे. आगामी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या तोंडावरच निवडणूक आयोगाने निर्णय जाहीर केल्याने संभ्रमाची स्थिती आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय निराशादायक आहे. 1966 मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष बनवला. निवडणूक आयोगाने तात्पुरता चिन्ह गोठवला आहे. शिवसेनेचे नेते माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी यावरून केंद्रीय निवडणूक आयोगाचे भाजप आणि शिंदे गटाला थेट आव्हान दिले आहे. चिन्ह गोठवून तुम्ही हृदय तोडले असेल, मात्र आत्मा तोडू शकत नाही. येत्या पोट निवडणुकीत 30 हजार मतांनी जिंकू असे शिवसेनेचे नेते माजी आमदार कृष्णा हेगडे Krishna Hegde म्हणाले आहेत.
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक ऐतिहासिक निवडणूक असणार आहे. या निवडणुकीचा प्रभाव आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत दिसून येईल. मागील महापालिका निवडणुकीत शिवसेना प्रथम क्रमांकाचे पक्ष राहिला होता. येत्या मनपा निवडणुकीतही तो कायम राहील. महाराष्ट्रातील करोड जनता माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोविड काळात केलेल्या कामगिरीमुळे यांच्या पाठीशी ठाम उभी आहे. त्यामुळे केंद्र सरकारने Central Govt जे षडयंत्र रचला आहे. त्याचा सामना करून जिंकू असा विश्वास व्यक्त केला आहे.