मुंबई- एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी बदनामीकारक पोस्टविरोधात सोशल मीडियांकडे मोर्चा वळविला आहे. त्यांनी मुंबईमधील दिंडोशी न्यायालयात याचिका दाखल ( Sameer Wankhedes plea in Dindoshi court ) केली आहे. या याचिकेत फेसबुक, ट्विटर आणि इतर समाज माध्यमांना कोणतीही मानहानिकारक पोस्ट करण्यास मनाई करण्यात यावी, अशी याचिकेतून ( restrict posting defamatory on social media ) विनंती करण्यात आली आहे.
एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांनी गुगल, फेसबुक आणि ट्विटर या सोशल मीडियाला आपल्या बाबतीत कोणतेही बदनामी कारक मजकूर अथवा पोस्ट करण्यास प्रतिबंधात्मक आदेश द्यावेत, या मागणीची याचिका मुंबईतील दिंडोशी कोर्टात केली होती. त्यावर ट्विटरने 22 पानी उत्तर ( tweeter reply in Dindoshi court ) दिले आहे. एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांच्याकडून सुरू असलेल्या कायदेशीर कारवाई थांबविण्याची ट्विरटने विनंती केली आहे. वानखेडे यांचा अर्ज चुकीचा आणि तथ्यहीन असल्याचे ट्विटरने 22 पानांच्या उत्तरात म्हटले आहे.