मुंबई- मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वस्तीगृहाला (Mumbai University On International Hostel ) सावरकर ( Savarkar ) यांचे नाव द्यावे. अशी सुचना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केली आहे. त्यामुळे राज्यात नविव वाद निर्माण होण्याची शक्याता आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी जाहिर कार्यक्रमात वसतीगृहाला सावरकरांचे वाव देण्याची सुचना केली होती. त्यावर छात्रभरती विद्यार्थी संघटनेने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचेच नाव वसतीगृहाला देण्याची मागणी केली आहे.
Koshyari On Mumbai University : मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाच्या नावावरून वाद - Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj
मुंबई विद्यापीठाच्या ( University of Mumbai ) आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाला (Mumbai University On International Hostel ) नाव देण्यावरून नवा वाद सुरू झाला आहे. मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वस्तीगृहाला सावरकर ( Savarkar ) यांचे नाव द्यावे अशी सुचना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांनी केली आहे. तर, छात्रभरती विद्यार्थी संघटनेने ( Chhatrabharati Vidyarthi Sanghatana ) राजर्षी छत्रपती शाहू महाराज ( Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj ) यांचेच नाव देण्याची मागणी केली आहे.
दोन दिवसांपूर्वी मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाला सावरकर यांचे नाव देण्याची सुचना केली. त्यानंतर त्वरित छात्रभारती विद्यार्थी संघटनेने महाराष्ट्रातील समतेचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज ( Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj ) यांचेच नाव द्यावे, अशी मागणी केली आहे. राज्यात सत्ता बदल झाल्याने त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी तसेच विरोधक यांच्यात नवा वाद उभा राहण्याची चिन्ह आहेत. त्या संदर्भात छात्रभारती विद्यार्थी ( Chhatrabharati Vidyarthi Sanghatana ) संघटनेचे राज्य कार्यध्यक्ष रोहित ढाले यांनी तशी मागणी पत्राद्वारे केली आहे.
हेही वाचा -शिवसेनेच्या आमदारांना विधिमंडळ सचिवांच्या नोटिसा; आदित्य ठाकरेंना नोटीस नाही...