महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरेगाव भीमा प्रकरण : रोना विल्सन यांना दोन आठवड्यांचा जामीन मंजूर - Rona Wilson latest news

आरोपी रोना विल्सन यांना वडिलांच्या अंत्यविधीसाठी उपस्थित राहण्यासाठी तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. 2018च्या कोरेगाव भीमा हिंसाचारातील 16 आरोपींपैकी एक रोना विल्सन यांचा एनआयए कोर्टाने आपल्या वडिलांच्या मृत्यूमुळे आयोजित करण्यात आलेल्या कौटुंबिक कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. विल्सनना जुलै 2018मध्ये अटक करण्यात आली होती.

रोना विल्सन
रोना विल्सन

By

Published : Sep 7, 2021, 5:36 PM IST

मुंबई -कोरेगाव भीमा आणि शहरी नक्षलवाद प्रकरणात मुंबईतील एनआयए न्यायालयाने आरोपी रोना विल्सन यांना वडिलांच्या अंत्यविधीसाठी उपस्थित राहण्यासाठी तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. 2018च्या कोरेगाव भीमा हिंसाचारातील 16 आरोपींपैकी एक रोना विल्सन यांचा एनआयए कोर्टाने आपल्या वडिलांच्या मृत्यूमुळे आयोजित करण्यात आलेल्या कौटुंबिक कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी तात्पुरता जामीन मंजूर केला आहे.

UAPAअंतर्गत न्यायालयीन कोठडीत

रोना विल्सनना जुलै 2018मध्ये अटक करण्यात आली होती. सध्या ते UAPA (अनलॉफूल अॅक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन अॅक्ट)अंतर्गत गुन्ह्यांसाठी न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे, की त्यांच्या वडिलांचे केरळमध्ये 18 ऑगस्ट 2021 रोजी निधन झाले. रिवाजानुसार, 16 सप्टेंबर 2021रोजी केरळमधील चर्चमध्ये 30व्या दिवसाच्या विधीसाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. परिस्थती लक्षात घेता न्यायालयाने रोना विल्सन यांना दिलासा देत 2 आठवड्यांसाठी जामीन मंजूर केला आहे.

इतर सदस्यांचीही चौकशी

एनआयएने रोना विल्सन यांच्या वडिलांच्या मृत्यूसंबंधी विधी रोना विल्सनचा भाऊ आणि कुटुंबातील इतर सदस्यांकडूनही केली जाऊ शकते, असे नमूद करत अर्जाला विरोध केला.

ABOUT THE AUTHOR

...view details