मुंबई -कोरेगाव-भीमा प्रकरणातील जामीन याचिका फेटाळणाऱ्या विशेष एनआयए कोर्टाने दिलेल्या दोन आदेशांना आव्हान देत फादर स्टॅन स्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. स्टॅन स्वामी यांच्या अपिलावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) जाब विचारला आहे.
मंगळवारी न्यायाधीश एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पिटाळे यांच्या खंडपीठाने दोन्ही अपीलमध्ये नोटीस बजावली असून राज्य जेल अधिकाऱ्यांना स्वामींचा वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. हा अहवाल 15 मे 2021 पर्यंत सादर करावा, असे ही कोर्टाने नमूद केले.
स्वामींच्या बाजूने ज्येष्ठ वकील मिहिर देसाई यांनी कोर्टाला सांगितले की, ऑक्टोजेनियन पार्किन्सन रोगाने फादर स्टेन स्वामी पीडित आहेत. तुरुंगातील कोविड प्रकरणात वाढ झाल्यामुळे स्वामींच्या प्रकृतीला गंभीर धोका असल्याची भीती उद्भवली असल्याचेही त्यांनी सांगितले. कोर्टाने याबाबत एनआयएला जाब विचारला असून तुंरुगातून वैद्यकीय अहवाल आल्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे.