मुंबई -कोकण रेल्वे मार्गावर विनाटिकीट आणि अनियमित तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पकडण्यासाठी गेल्या महिन्यात विशेष तिकीट तपासणी अभियान राबवण्यात आले. या अभियानातंर्गत एका महिन्यात 8 हजार 633 फुकट्या प्रवाशांना पकडण्यात आले ( Konkan ailway Action 8 Thousand 633 Passenger ) असून, त्यांच्याकडून 56 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला ( Konkan Railway Recovered 56 Lakh Fine ) आहे.
प्रवाशांनी तक्रारी केल्यानंतर कारवाई - उन्हाळ्याच्या सुट्ट्या निमित्त मुंबई-पुण्यातील चाकरमानी मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणात कोकणात जातात. कोकणात जाण्यासाठी अनेक प्रवाशांनी आरक्षित तिकिटे काढून ठेवली होती. मात्र, होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमीच्या दरम्यान आरक्षित तिकीट काढलेल्या प्रवाशांना बसण्यासाठी जागा मिळाली नाही. यावेळी अनेक प्रवाशांनी कोकण रेल्वेकडे याबाबत तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत कोकण रेल्वेने प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी विशेष अभियान गेल्या महिन्यात हाती घेतले होते. या अभियानांतर्गत मार्च महिन्यात एकूण 8 हजार 633 विनातिकिट प्रवास करणारे प्रवासी आढळून आले आहे. त्यांच्यावर कारवाई करून 55 लाख 99 हजारांचा दंड कोकण रेल्वेकडून वसूल करण्यात आला आहे.