महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Raksha Bandhan Muhurat राखी बांधण्यासाठी हे आहेत शुभ मुहूर्त - Raksha Bandhan

काही लोकांच्या मते रक्षाबंधन ( Raksha Bandhan ) गुरुवार, 11 ऑगस्टला आहेत, तर काहींच्या मते तो शुक्रवार, 12 ऑगस्टलासुद्धा साजरा केला जाऊ शकतो. या वर्षी श्रावण महिन्याच्या ( Shravan Purnima ) पौर्णिमेला 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10:33 वाजता सुरू होईल आणि 12 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 07:02 वाजता समाप्त होईल.

Raksha Bandhan Muhurat
राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त

By

Published : Aug 11, 2022, 11:22 AM IST

मुबंई - यावर्षी रक्षाबंधन सणाच्या ( Raksha Bandhan ) तारखेबाबत बराच गोंधळ आहे. काही लोकांच्या मते रक्षाबंधन गुरुवार, 11 ऑगस्टला आहेत, तर काहींच्या मते तो शुक्रवार, 12 ऑगस्टलासुद्धा साजरा केला जाऊ शकतो. या वर्षी श्रावण पौर्णिमा ( Shravan Purnima ) किंवा नारळी पौर्णिमा ( Narali purnima ) 11 ऑगस्ट रोजी येत आहे. हिंदू पंचांगानुसार पौर्णिमा तिथी ( Purnima Tithi according to Hindu Almanac )11 ऑगस्ट रोजी सकाळी 10:33 वाजता सुरू होईल आणि 12 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 07:02 वाजता समाप्त होईल. तथापि, भद्रा योग देखील येत आहे. 11 ऑगस्ट रोजी दिवसभर भाद्राचे सावट आहे. मात्र भद्रा मकर राशीत असल्याने तिचे निवासस्थान अधोलोकात असल्याचे मानले जाते, त्यामुळे भद्राचा कोणताही परिणाम होणार नाही. मेष, वृषभ, मिथुन, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु किंवा मकर राशीच्या चंद्रामध्ये भद्रा येत असेल तर ती शुभ फल देणार आहे, त्यामुळे आज रक्षाबंधनाचा सण साजरा करावा हे स्पष्ट आहे.

या काळात रक्षाबंधन करू नये -यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी सायंकाळी 5:17 वाजेपर्यंत भाद्राची सावली राहील. यानंतर संध्याकाळी 6.18 ते 8-20 पर्यंत मुख भद्रा असेल. या दिवशी रात्री 8.51 वाजता भाद्रची सावली पूर्णपणे नाहीशी होईल. शास्त्रानुसार गुरुवारी चंद्र मकर राशीत राहणार असून भद्रा अधोलोकात असल्याने भद्राचा कुठलाही परिणाम होणार नाही, मात्र गुरुवारी सायंकाळी 6.18 ते 8.20 या कालावधीत भद्राच्या मुखाचा काळ असेल, या काळात रक्षाबंधन करू नये.

राखी बांधण्याचा मुहूर्त -रक्षाबंधनाला राखी बांधण्यासाठी अनेक शुभ मुहूर्तआहेत. या दिवशी सकाळी 11.37 ते 12.29 या वेळेत अभिजीत मुहूर्त आहे. त्यानंतर दुपारी 02:14 ते 03:07 पर्यंत विजय मुहूर्त असेल. या दरम्यान, शुभ मुहूर्त पाहून तुम्ही राखी बांधू शकता.

हेही वाचा -Rakshabandhan 2022 अशी सजवा रक्षाबंधन थाळी

हेही वाचा -Rakshabandhan Festival पर्यावरण संरक्षणांचा संदेश देणाऱ्या राखीतून महिलांना मिळतोय रोजगार

ABOUT THE AUTHOR

...view details