मुंबई - राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून उच्च व तंत्र शिक्षण विभागासोबत विधी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या सामायिक प्रवेश परीक्षाच्या सुधारीत तारखा जाहीर केल्या आहेत. यात उच्च तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेचा समावेश आहे. पीसीबी ग्रुपच्या परीक्षा या १ ते ९ ऑक्टोबर आणि पीसीएम ग्रुपच्या १२ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत.
राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणऱ्या एम. आर्किटेक, या अभ्यासक्रमांच्या सामायिक प्रवेश परीक्षा ३ ऑक्टोबरला घेण्यात येणार आहेत. तर एमसीए, एचएमसीटी, बी.एचएमसीटी या अभ्यासक्रमांच्या सामायिक प्रवेश परीक्षा या १० ऑक्टोबर रेाजी घेतल्या जाणार असल्याचे सीईटी कक्षाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, उच्च शिक्षण विभागातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या नवीन तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत. एम. पीएडसाठीची परीक्षा ही ३ ते ७ ऑक्टोबर, एम. एडची ३ ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे.