मुंबई- घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचे दर मुंबईसह महाराष्ट्रात 900 रुपयांच्या वर आहेत. गॅस सिलेंडर दरवाढीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी एक आंनदाची बातमी आहे. दिल्लीसह 28 शहरात एलपीजी कंपोझिट सिलेंडर मिळणार आहेत. या सिलेंडरचे वजन आधीच्या सिलेंडरपेक्षा कमी आहे. त्या सिलिंडरची किंमत 634 रुपये इतकी असणार आहे. मात्र, ही ग्राहकांची निव्वळ धूळफेक असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.
मुंबईसह महाराष्ट्रात गॅस सिलेंडरचे दर 900 रुपयांच्या वर आहेत. तर दिल्लीमध्ये 14 किलो एलपीजी गॅस सिलेंडरचे 899.50 पैसे इतके आहेत. ऑक्टोबर महिन्यानंतर सिलेंडरच्या किंमती स्थिर असल्या तरी गॅस दरवाढीमुळे देशभरातील ग्राहक त्रस्त आहेत. अशा ग्राहकांना कंपोझिट सिलेंडरमुळे दिलासा मिळणार आहे. 10 किलोचे कंपोझिट सिलेंडर 633.50 रुपयांना तर 5 किलोचे कंपोझिट सिलेंडर 502 रुपयांना मिळणार आहे.
हेही वाचा-आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा भ्रमाचा भोपळाही फुटणार - शिवसेना
काय आहे कंपोझिट सिलेंडर -
देशभरात घरोघरी एलपीजी सिलेंडर वापरले जातात. हे सिलेंडर लोखंडी असतात. या एका खाली सिलेंडरचे वजन 17 किलो असते. यात 14 किलो गॅस भरल्यावर त्याचे वजन सुमारे 31 किलो इतके होते. गॅस कंपन्यांनी तीन लेअर असलेले कंपोझिट सिलेंडर मार्केटमध्ये आणले आहेत. याचे वजन जुन्या सिलेंडरपेक्षा 7 किलो कमी असेल. म्हणजेच हे सिलेंडर 10 किलो वजनाचे असून त्यात 10 किलो गॅस असणार आहे. याआधी वापरण्यात येणाऱ्या सिलेंडरमध्ये 14 किलो गॅस असतो. तर आता नव्या सिलेंडरमध्ये 10 किलो गॅस मिळणार आहे.
हेही वाचा-हृदयद्रावक : भाऊबीजेच्या पूर्वीच बहिण भावावर काळाचा घाला; जात होते मामाच्या गावी