मुंबई- जगातील टॉप टेन श्रीमंताच्या यादीतील व्यक्ती असणारे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया घराबाहेर काही अंतरावर स्कॉर्पिओ गाडी जिलेटिन स्फोटकांनी भरलेली आढळून आली होती. त्यानंतर या संदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून तपास केला जात असताना मुंबई पोलीस खात्यातील एकेकाळी नावाजलेले आणि तेवढेच वादात अडकलेल्या दोन एन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. यात पहिल नाव येते ते सचिन वाझे याचे, तर दुसरे नाव म्हणजे मुंबईत तब्बल 312 गॅंगस्टरचा खात्मा करणारे प्रदीप शर्मा यांचे. मुंबई पोलीस खात्यातले एन्काऊंटर स्पेशालिस्ट अधिकारी हे नेहमीच वादात अडकले होते. मुंबई पोलीस खात्यातील एन्काऊंटर स्पेशालिस्ट अधिकाऱ्यांचा आढावा घेणारा ईटीव्ही भारतचा हा विशेष वृत्तांत...
90 दशकात मुंबईत वाढले टोळी युद्ध-
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात 90 च्या दशकात गॅंगवार हा चांगलाच फोफावला होता. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, अरुण गवळी, अश्विन नाईक, सुरेश मंचेकर, माया डोळस, मन्या सुर्वे या सारख्या गुंडांकडून मुंबईतील उद्योगपती बिल्डर यांना सतत खंडणीसाठी धमक्या दिल्या जात होत्या. यातून सुरू झालेल्या टोळीयुद्धावर अंकुश बसविण्यासाठी मुंबई पोलिसांच्या काही निवडक अधिकार्यांनी कारवाईचा फास आवळत अनेक गुंडांना यमसदनी पाठवले होते. मात्र पोलिसांनी सुरुवातीला केलेल्या कारवाईला प्रसिद्धी मिळाल्यानंतर यावर मानवी हक्काची पायमल्ली होत असल्यामुळे मुंबई पोलीस खात्यातील अनेक पोलिस अधिकारी हे वादात अडकले. यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यात आली होती. या पैकी एक म्हणजे सध्या चर्चेत असलेले नाव प्रदीप शर्मा...
1) प्रदीप शर्मा
मुंबई पोलीस दलातील एन्काउंटर स्पेशालिस्ट अधिकार्यांची अशी आहे वादग्रस्त कारकीर्द - मुंबई पोलीस सचिन वाझे
मुंबईतील गुंडांच्या टोळीयुद्धावर अंकुश बसविण्यासाठी मुंबई पोलिसांच्या काही निवडक अधिकार्यांनी कारवाईचा फास आवळत अनेक गुंडांना यमसदनी पाठवले होते. मात्र पोलिसांनी सुरुवातीला केलेल्या कारवाईला प्रसिद्धी मिळाल्यानंतर यावर मानवी हक्काची पायमल्ली होत असल्यामुळे मुंबई पोलीस खात्यातील अनेक पोलिस अधिकारी हे वादात अडकले. यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यात आली होती. या पैकी एक म्हणजे सध्या चर्चेत असलेले नाव प्रदीप शर्मा...
या पोलीस अधिकाऱ्याने तब्बल 312 गुंडांचा एन्काऊंटर केलेला असून यामध्ये लष्करे ए तोयबाच्या काही दहशतवाद्याचा एन्काऊंटरही केला होता. 2008 मध्ये लखनभैया बनावट चकमक प्रकरणी या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली होती. मात्र 2013मध्ये न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी प्रदीप शर्माला निर्दोष मुक्त केले होते. या अगोदर प्रदीप शर्मा याच्यावर भ्रष्टाचार व गुन्हेगारी विश्वाशी संबंध ठेवण्याचे आरोप करण्यात आले होते. मात्र यातील कुठलाही आरोप सिद्ध न झाल्यामुळे 2017 मध्ये या अधिकाऱ्याला पुन्हा पोलीस सेवेत सामावून घेण्यात आले होते. आता प्रदीप शर्मा याला अँटिलिया स्फोटक प्रकरणात एनआयएकडून अटक करण्यात आले आहे.