महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Kishori Pednekar on Shinde Group:...आणि ठाकरे घराण्याकडे पाहायचं वाकून', शिंदे गटातील घराणेशाहीवरून किशोरी पेडणेकर यांची जहरी टीका - dynasticism of Shinde group

Kishori Pednekar on Shinde Group: कथित पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी Patra Chawl Case ईडीच्या अटकेत असलेले शिवसेनेचे नेते व राज्यसभेचे खासदार संजय राऊत MP Sanjay Raut यांच्या कुटुंबीयांची माजी महापौर किशोरी पेडणेकर Former Mayor Kishori Pednekar यांनी भेट घेतली आहे. शिवसेनेचा गटप्रमुखांचा मेळावा असेल, अथवा अन्य सभा असतील उद्धव ठाकरे व शिवसेनेचे अन्य नेत्यांचा संजय राऊत यांच्या बद्दल विशेष सॉफ्ट कॉर्नर दिसतो.

Kishori Pednekar on Shinde Group
Kishori Pednekar on Shinde Group

By

Published : Oct 1, 2022, 6:41 PM IST

मुंबई:कथित पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी Patra Chawl Case ईडीच्या अटकेत असलेले शिवसेनेचे नेते व राज्यसभेचे खासदार संजय राऊत MP Sanjay Raut यांच्या कुटुंबीयांची माजी महापौर किशोरी पेडणेकर Former Mayor Kishori Pednekar यांनी भेट घेतली आहे. शिवसेनेचा गटप्रमुखांचा मेळावा असेल, अथवा अन्य सभा असतील उद्धव ठाकरे व शिवसेनेचे अन्य नेत्यांचा संजय राऊत यांच्या बद्दल विशेष सॉफ्ट कॉर्नर दिसतो. आता दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा संजय राऊत यांचे नाव चर्चेत आल आहे. त्यातच किशोरी पेडणेकर यांनी राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.

शिंदे गटातील घराणेशाहीवरून किशोरी पेडणेकर यांची जहरी टीका

संजय राऊत आमचे मोठे बंधूया भेटीनंतर माध्यमांशी बोलताना माझी महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, एक तर हा मैत्री बंगला आहे. संजय राऊत हे आमचे मोठे बंधू आहेत. आमचे कौटुंबिक संबंध आहेत. तेवढी मैत्री देखील दृढ आहे. सध्या महाराष्ट्रात परिस्थिती वेगळे आहे. संजय राऊत यांचा आवाज दाबण्याचे काम विरोधकांनी केलेला आहे. मात्र, संजय राऊंतचा एक संदेश सत्यमेव जयते हा कायमच राहील. संजय राऊत हे सातत्याने भाजपला विरोध करत होते. त्यामुळेच त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला. अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

मला वाटत नाही नार्वेकर सोडून जातीलसध्या सुरू असलेल्या मिलिंद नार्वेकर यांच्या चर्चा बद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, मिलिंद नार्वेकर शिवसेना सोडून जातील, असे मला वाटत नाही. नारायण राणे यांनी देखील त्यावेळेस बंड पुकारल्यावर मिलिंद नार्वेकर यांची नावे चर्चा झाली होती. मात्र ती गेले नव्हते. आता देखील पुन्हा तशाच चर्चा आणि बातम्या मुद्दाम पेरल्या जात आहेत. मला वाटत नाही आमचे नेते मिलिंद नार्वेकर हे शिवसेना सोडून जातील.

...ठाकरे घराण्याकडे पाहायचं वाकूनशिंदे गटाने जाहीर केलेला युवा सेनेच्या नव्या कार्यकारणीबद्दल बोलताना किशोरी पेडणेकर म्हणायला की, लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण स्वतः कोरडे पाषाण अशी लोकांची अवस्था झाली आहे. स्वतःची नाती ठेवायची झाकून आणि बाळासाहेबांच्या घराण्याकडे पाहायचं वाकून. आदित्य ठाकरे यांनी वयाच्या पंधराव्या वर्षापासून स्वतःला सिद्ध केलं आहे. आदित्य यांने स्वतः दाखवलं आहे. त्यांचा झांजावात दाखवला आहे. लक्षात ठेवा सूर्यला ग्रहण लागलं, तर तो अधिक तेजाने बाहेर येतो.

ABOUT THE AUTHOR

...view details