महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Rauf Memon controversy रौफ मेमन व्हायरल फोटो प्रकरणी किशोर पेडणेकरांचे भाजपला चोख प्रत्युत्तर, दिले हे आव्हान - pedanekar twitt on rauf memon

याकूब मेमन कबर सजावट (yakub memon grave controversy) प्रकरणावरून भाजपने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (uddhav thackeray) आरोप केले होते. दरम्यान, किशोरी पेडणेकरांचा (kishori pedanekar) याकूब मेमनचा नातेवाईक रौफ मेमन सोबतचा व्हिडीओ व्हायरल झाला. मात्र, किशोरी पेडणेकरांनी हे सर्व आरोप फेटाळत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांचाचं रौफ मेमन सोबतचा फोटो समोर (Fadnavis photo with Rauf Memon) आणला आहे. भाजपने उत्तर द्याव, अशी मागणीदेखील पेडणेकरांनी केली आहे.

kishori pedanekar on rauf memon controvesry
रौफ मेमन प्रकरणी पेडणेकरांचं भाजपला चोख प्रत्युत्तर, फडणवीसांचा रौफ मेमनसोबतचा फोटो व्हायरल

By

Published : Sep 10, 2022, 3:38 PM IST

मुंबईयाकूब मेमन कबर सजावट (yakub memon grave controversy) प्रकरणावरून भाजपने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (uddhav thackeray) आरोप केले होते. दरम्यान, किशोरी पेडणेकरांचा (kishori pedanekar) याकूब मेमनचा नातेवाईक रौफ मेमन सोबतचा व्हिडीओ व्हायरल झाला. मात्र, किशोरी पेडणेकरांनी हे सर्व आरोप फेटाळत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांचाचं रौफ मेमन सोबतचा फोटो समोर (Fadnavis photo with Rauf Memon) आणला आहे. भाजपने उत्तर द्याव, अशी मागणीदेखील पेडणेकरांनी केली आहे. यावरून पेडणेकर यांनी एक ट्विट (pedanekar twitt on rauf memon) केले आहे. यात देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील रौफ मेमन सोबत दिसत आहेत. तसेच भाजपाच्या १२ तोंडाने बोलणाऱ्या लोकांनी या फोटोला कॅप्शन देण्याचे आवाहन पेडणेकर यांनी केले आहे.

फडणवीसांसोबत रौफ मेमन (Rauf Memon with Fadnavis) दरम्यान, याकूब मेमनच्या कबरीवरून बडा कब्रस्तानला धमकी देण्यात आली होती. हा धमकी देणारा रौफ मेमन याचा फोटो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सोबत व्हायरल झाला आहे. यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

रौफ मेमन प्रकरणी पेडणेकरांचं भाजपला चोख प्रत्युत्तर, फडणवीसांचा रौफ मेमनसोबतचा फोटो व्हायरल

काय आहे प्रकरण
मरीन लाइन्स येथे बडा कब्रस्तान आहे. त्यात १९९३ च्या बॉम्ब स्फोटातील आरोपी याकूब मेमन याला फाशी दिल्यानंतर दफन करण्यात आले होते. या कबरीचे महविकास आघाडी सरकार असताना सुशोभीकरण करण्यात आल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी भाजपाने थेट उद्धव ठाकरे यांना टार्गेट केले होते. यानंतर पोलिसांनी कबरी जवळची लाईट काढून टाकली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details