मुंबई - दुसऱ्यांवर भ्रष्टाचाराचे केल्याचा आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या आयएनएस विक्रांत प्रकरणी चांगलेच अडकले आहेत. कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ते संपर्काच्या बाहेर आहेत. यावरून कमळाच हे चिखल गेले कुठे, असा थेट सवाल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपा आणि सोमय्या यांना विचारला आहे.
कमळाच चिखल गेलं कुठे? भाजपा आणि सोमय्यांना सवाल सोमय्यांचा जामीन अर्ज फेटाळला -पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धात शौर्य गाजवणारी आयएनएस विक्रांत ही युद्ध नौका भंगारात काढली जाणार होती. यावर या युद्धनौकेचे स्मारक बनवावे अशी मागणी पुढे आली. स्मारक बनवावे यासाठी निधी जमवण्यात आला. किरीट सोमय्या यांनीही याच्यासाठी निधी जमवला होता. मात्र तो निधी सरकारकडे जमा केला नव्हता. याविरोधात पोलीसांकडे तक्रार दाखल झाली असून त्याविरोधात सोमय्या सत्र न्यायालयात गेले होते. सोमय्या यांनी जामिनासाठी अर्ज केला असता तो फेटाळण्यात आला आहे. याच वेळी सोमय्या हे नॉट रिचेबल झाले आहेत.
कमळाच चिखल गेलं कुठ ?- सोमय्या नॉट रिचेबल झाले असल्याच्या प्रकाराबाबत बोलताना कमळाच चिखल गेलं कुठे असा प्रश्न माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे. हा दुसऱ्यांवर बोट दाखवून हातोडे घेऊन पळत होता, आता नॉट रिचेबल का आहे असा प्रश्न उपस्थित करत कागद आणि कायद्याची लढाई आहे. आपल्याकडे बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान आहे. संविधानाने दिलेल्या अधिकाराप्रमाणे ती लढाई लढू असे पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा - Kanhaiya Kumar : भाजपकडून रामाच्या नावाने देशामध्ये दंगली; कन्हैय्या कुमार यांचा घणाघात
भोंगा घेऊन बोंबलणारं पात्र -किरीट सोमय्या हे केवळ भोंगा घेऊन बोंबलणार असे पात्र महाराष्ट्रात निर्माण झाले आहे. अनेकांनी हा भोंगा झोपू देत नाही म्हटले आहे. ज्यांना भोंग्याने झोपू दिले नाही ते भाजपात गेले आणि आता शांत झोपले आहेत. याचा अर्थ किरीट सोमय्या भोंगा घेऊन बोलणार मग सगळे जाऊन भाजपात विलीन होणार. त्यानंतर सगळे बसणार आणि इतरांच्या मागे लागणार अशी टीका पेडणेकर यांनी केली आहे.