मुंबई -मुंबईमध्ये रात्रभर पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने मुंबईची तुंबई झाली आहे. आज एकाच वेळी समुद्राला भरती, सतत मुसळधार पाऊस यामुळे पाणी तुंबलंय तसेच मुंबईत पाणी भरणार नाही, असे कधीही बोललेले नाही असे स्पष्टीकरण मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहे.
महापौरांनी घेतला आढावा -
हवामान विभागाने ८ ते ११ जूनपर्यंत जोरदार पाऊस पडेल असा इशारा दिला आहे. मुंबईत काल रात्रीपासून पाऊस पडत आहे. आज सकाळ पासून पावसाने जोर धरला आहे. यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. मुंबईची तुंबई झाल्याने रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला भेट देऊन या परिस्थितीचा आढावा महापौर किशोरी पेडणेकर यांनी घेतला. त्यानंतर त्यांनी पाणी साचलेल्या हिंदमाता परिसराला पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांच्या सह भेट दिली. यावेळी महापौर बोलत होत्या. यावेळी बोलताना मुंबईचा आढावा घेतला शहरात 195, पूर्व उपनगरात 137 मिली, पश्चिम उपनगरात 85 मिली पाऊस पडला आहे. पाणी साचवून समुद्रात सोडलं जातं. मात्र एकाच वेळी समुद्राला भरती आणि मोठा पाऊस असला की शहरात पाणी तुंबते. ४ तासांच्या आत पाण्याचा निचरा झाला नाही तर नालेसफाईचे काम चांगलं झालं नाही हे मान्य करावं लागेल, असे महापौर म्हणाल्या.
मुसळधार पावसाने साचले पाणी - महापौर निंदकाचे घर असावे शेजारी - 2005 पासून उपाययोजना करत आल्याने आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे, हिंदमाता प्रकल्पाला उशीर कारण कोरोनामुळे मनुष्यबळ कमी पडत आहे. विरोधकांना काय आरोप करायचे ते करू देत, आमचं काम सगळ्या जगाने पाहिलं आहे. निंदकाचे घर असावे शेजारी या न्यायानं आम्ही विरोधकांच्या टीकेकडे पाहु असे महापौर म्हणाल्या.
रेल्वे प्रशासनावर महापौरांची टीका -
रेल्वे परिसरात पाणी साचल्याने रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. पालिकेने रेल्वेच्या हद्दीतील कल्व्हर्ट साफ केल्याने रेल्वेने पालिकेला पत्र पाठवले आहे. याबाबत बोलताना रेल्वे अधिकाऱ्यांचा समन्वय योग्य नाही. रेल्वेचे अधिकारी बाहेरुन आलेले आहेत, त्यांना गंभीरता नाही असे महापौर म्हणाल्या.