महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पावसाळ्यात गाय-माय गटारात पडणार नाही, याची दक्षता घ्या - किशोरी पेडणेकर - किशोरी पेडणेकरांचे पालिका प्रशासनाला आवाहन

मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात पावसाचे पाणी ( rain water issue in Mumbai ) साचते. या पाण्याचा निचरा करण्यासाठी गटारावरील झाकण ( safety Manhole in Mumbai ) उघडले जाते. काही वेळा पावसाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे गटारावरील झाकण ( water of rain in manhole ) उघडते. तर काही वेळा झाकण तुटलेले असते. यामुळे पावसाळ्यात नागरिक गटारात पडण्याच्या घटना घडतात.

किशोरी पेडणेकर
किशोरी पेडणेकर

By

Published : Mar 29, 2022, 10:29 PM IST

Updated : Mar 29, 2022, 10:55 PM IST

मुंबई- दादर येथे ड्रेनेजच्या चेंबरमध्ये एक गाय पडल्याची घटना सोमवारी घडली आहे. येत्या काही महिन्यात पावसाळा येत आहे. पावसाळ्यात उघड्या गटारात नागरिक पडण्याच्या घटना घडतात. अशा घटना घडू नये, म्हणून पालिका अधिकाऱ्यांनी गटारावरील झाकण उघडे राहणार नाही, याची काळजी घ्यावी. त्यात कोणाचीही गाय किंवा माय गटारात पडणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन काळजीवाहू महापौर किशोरी पेडणेकर यांनी पालिका प्रशासनाला केले आहे.

पावसाळ्यात गाय-माय गटारात पडणार नाही, याची दक्षता घ्या

गटारे उघडी राहिल्याने अपघात-
मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात पावसाचे पाणी ( rain water issue in Mumbai ) साचते. या पाण्याचा निचरा करण्यासाठी गटारावरील झाकण ( safety Manhole in Mumbai ) उघडले जाते. काही वेळा पावसाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे गटारावरील झाकण ( water of rain in manhole ) उघडते. तर काही वेळा झाकण तुटलेले असते. यामुळे पावसाळ्यात नागरिक गटारात पडण्याच्या घटना घडतात. असाच प्रकार सोमवारी दादर येथे घडला. भवानी शंकर रोडवर फुटपाथवर एका ड्रेनेजच्या चेंबरवरील झाकण सरकल्याने एक गाय त्या चेंबरमध्ये पडली. तब्बल पाच तासाच्या प्रयत्नानंतर त्या गायीला चेंबरमधून बाहेर काढण्यात आले.

हेही वाचा-AAP on Pravin Darekar : दरोडेखोर प्रवीण दरेकरांना विरोधी पक्षनेते पदावरून हटवा, आपची मागणी

गाय, माय गटारात पडू नये -
दादर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर बोलताना, येत्या काही दिवसात पावसाला सुरुवात होणार आहे. पावसाळ्यात असे प्रकार घडू नयेत म्हणून पालिका अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी. पावसाळ्यापूर्वी गटावरील झाकणे नसल्यास ती बसवावीत. पावसाच्या पाण्याच्या वेगामुळे अनेक वेळा गटारावरील झाकणे निघतात, अशा ठिकाणी त्वरित झाकणे बसवावीत, असे आवाहन काळजीवाहू महापौरांनी केले आहे. कोणत्याही गटारात कोणाची गायच नव्हे तर कोणाची मायसुद्धा गटारात पडू नये याची काळजी घ्यावी असे आवाहनही महापौरांनी केले आहे.

हेही वाचा-Bjp on Adhan Sound : मशिदीवरील लाऊड स्पीकरमुळे ध्वनि प्रदूषण, भाजपचे मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र

Last Updated : Mar 29, 2022, 10:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details