मुंबईमागील काही दिवस ईडीच्या कोठडीत असलेले शिवसेनेचे फायर ब्रँड नेते संजय राऊत यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, भाजप नेते किरीट सोमैया BJP leader Kirit Somaiya यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर संजय राऊत Sanjay Raut यांचे निकटवर्तीय समजले जाणारे सुजित पाटकर Sanjay Raut close relative Sujit Patkar यांच्यासह 3 जणांवर ईडीने आता गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा लाईफलाईन हॉस्पिटल गैरव्यवहार प्रकरणी Lifeline Hospital malpractice case दाखल करण्यात आला असून, यात तब्बल 38 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप सुजित पाटकर यांच्यावर आहे.
किरीट सोमैयांनी केली होती तक्रारसुजित पाटकर यांच्यावर लाईफ लाईन हॉस्पिटलच्या Lifeline Hospital malpractice case कामात तब्बल 38 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याबाबतची तक्रार भाजप नेते किरीट सोमैया यांनी ईडीकडे केली होती. मात्र, त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात असल्याने सुजित पाटकर यांच्यावर पोलीस कारवाई करत नव्हते, अशी तक्रार किरीट सोमैया यांनी केली होती.
स्वप्ना पाटकर ED कार्यालयातमहाराष्ट्रातील पत्रा चाळ घोटाळा प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर या मंगळवारी अंमलबजावणी संचालनालय ईडी कार्यालयात जबाब नोंदवण्यासाठी गेल्या होत्या. ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. स्वप्ना पाटकर या शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या पत्नी आहेत. तिने संजय राऊत यांच्यावर छळ, धमकी आणि शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे.
संजय राऊत यांच्या अडचणीत वाढमुंबईतील गोरेगाव येथील पत्रा चाळच्या पुनर्विकासातील कथित भ्रष्टाचार प्रकरणात ईडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक केली होती. ते सध्या मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आहेत. प्रदीर्घ चौकशी आणि घरावर छापे टाकल्यानंतर ईडीने 31 जुलै रोजी त्याला अटक केली होती. सध्या 5 सप्टेंबर पर्यंत कस्टडी वाढवण्यात आली आहे. त्यातच आता त्यांचे निकटवर्तीय समजले जाणारे सुजित पाटकर यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाल्याने भविष्यात संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
हेही वाचाBilkis Bano Case बिल्कीस बानो प्रकरणातील दोषींचे स्वागत करणे अयोग्य, देवेंद्र फडणवीस