मुंबई - भाजप नेते किरीट सोमैया यांचा मुलगा नगरसेवक नील सोमैया यांना शनिवारी मुलुंड पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. एका जुन्या खंडणीच्या गुन्ह्यासंदर्भात नील सोमैया यांची मुलुंड पोलिसांनी चौकशी केली. या गुन्ह्यासंदर्भात नील सोमैया यांचे स्टेटमेंट घेण्यात आले, अशी माहिती परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली.
जुन्या खंडणीच्या गुन्ह्यासंदर्भात किरीट सोमैया यांचा मुलगा नील सोमैया यांची मुलुंड पोलिसांकडून चौकशी - नील सोमैया यांची मुलुंड पोलिसांकडून चौकशी
भाजप नेते किरीट सोमैया यांचा मुलगा नगरसेवक नील सोमैया यांना शनिवारी मुलुंड पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलवण्यात आले होते.
नील सोमैया
हेही वाचा -'एल्गार' ही बेकायदेशीर नाही, संविधानविरोधी काम करणारी नाही - अरुंधती राय
दरम्यान, या संदर्भात नील सोमैया यांना विचारणा केली असता मुलुंड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची बदली झाली असल्यामुळे त्यांना भेटण्यासाठी मी मुलुंड पोलीस ठाण्यात गेलो होतो, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच आपली अशी कुठलीही चौकशी झाली नसल्याचे नील सोमैया यांनी सांगितले.