महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

धनंजय मुंडेंविरोधात किरीट सोमैया यांचे निवडणूक आयोगाला पत्र - Demand for resignation of Dhananjay Munde

सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात मुंबईतील एका पार्श्वगायिकेने बलात्काराचा आरोप केला आहे. मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप झाल्याने भाजप नेते आक्रमक झाले असून, त्यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हा मुंडेंना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हणत आरोप फेटाळून लावले आहेत.

धनंजय मुंडेंविरोधात किरीट सोमैया यांचे निवडणूक आयोगाला पत्र
धनंजय मुंडेंविरोधात किरीट सोमैया यांचे निवडणूक आयोगाला पत्र

By

Published : Jan 13, 2021, 7:43 PM IST

मुंबई - सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात मुंबईतील एका पार्श्वगायिकेने बलात्काराचा आरोप केला आहे. मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप झाल्याने भाजप नेते आक्रमक झाले असून, त्यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हा मुंडेंना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हणत आरोप फेटाळून लावले आहेत.

किरीट सोमैया यांचे निवडणूक आयोगाला पत्र

किरीट सोमैया यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. या पत्रात सोमैया यांनी म्हटले आहे की, धनंजय मुंडे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात दुसरी पत्नी, अपत्य आणि मालमत्तेबाबतची माहिती लपवली आहे. त्यामुळे त्यांची चौकशी करून, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी.

धनंजय मुंडेंविरोधात किरीट सोमैया यांचे निवडणूक आयोगाला पत्र

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी

दरम्यान किरीट सोमैया यांच्या पाठोपाठ चित्रा वाघ यांनी देखील धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकरणाची मुंबई पोलिसांनी निपक्षपातीपणे चौकशी करावी, पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडू नये, कितीही मोठा नेता असुदे दोषींना पाठिशी घालू नका, जोपर्यंत संपूर्ण तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रीपदापासून दूर ठेवले पाहिजे असं चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. अशा मोठ्या घटनांमध्ये पीडिता व तिच्या कुटुंबीयांवर दबाव आणला जाण्याची शक्यता आहे. पुराव्यांमध्ये छेडछाड होऊ शकते. तपास कार्यात अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नैतिकता दाखवत धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा' अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. तर महाराष्ट्र भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांनी देखील मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details