मुंबई -भाजपाचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी आता शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. अनिल परब यांनी अनधिकृतपणे म्हाडाची जागा बळकावली, या जागेवर त्यांनी अनधिकृत बांधकाम केले, असे सोमैया यांनी लोकायुक्तांकडे दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे.
दरम्यान आता या मुद्द्यावरून पुन्हा एकदा शिवसेना आणि किरीट सोमैया आमने-सामने येण्याची शक्यता आहे. किरीट सोमैया गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. त्यांनी आज मंत्री अनिल परब यांच्याविरोधात लोकायुक्तांकडे तक्रार दाखले केली आहे.
परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात किरीट सोमैयांची तक्रार तक्रारीमध्ये नेमके काय म्हटले आहे सोमैया यांनी?
वांद्रे येथील म्हाडाच्या दोन इमारतींमधील मधल्या जागेत अनिल परब यांनी अनधिकृतरित्या आपले कार्यालय थाटल्याचा आरोप किरीट सोमैया यांनी केला आहे. विलास शेगले हे या अनधिकृत बांधकामाबाबत संघर्ष करत आहेत. 27 जून 2019 रोजी म्हाडाने अनिल परब यांना नोटीस बजावली होती. मात्र, त्यानंतर ठाकरे सरकारच्या दबावामुळे अनिल परब यांच्या अनधिकृत कार्यालयावर कारवाई झाली नसल्याचे किरीट सोमैया यांनी म्हटले आहे.
हेही वाचा -तलवारी, भाले, इतर शस्त्रे घेऊन शीखांचा पोलिसांवर हल्ला, नांदेड पोलीस अधीक्षकासह ४ जखमी