मुंबई - अलिबागच्या कोराली गावात बेनामी मालमत्ता जमा केल्याच्या आरोपावरून माजी खासदार आणि भाजपचे नेते किरीट सोमैया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात मुंबईच्या आयकर विभागात तक्रार केली आहे. आयकर विभागाचे डायरेक्टर जनरल एम व्ही भानुमाथी यांची भेट घेऊन या संबंधित मालमत्तेचे 17 प्रकारचे पुरावे सादर केल्याचं किरीट सोमैया यांनी सांगितले.
हेही वाचा -राज ठाकरेंना सध्या प्रसिद्धीची गरज; जयंत पाटलांची टीका
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे जे प्रतिज्ञापत्र सादर केलं त्यामध्ये या मालमत्तेची नोंद नाही, असाही आरोप सोमैया यांनी यावेळी केला आहे. गेल्या आठ वर्षापासून अन्वय नाईक यांच्या नावाने अलिबागमधून कोराली गावात असलेल्या मालमत्तेचा कर उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे भरत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात किरीट सोमैयांची आयकर विभागात तक्रार काय आहे प्रकरण-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वास्तुविशारद अन्वय नाईक यांची अलिबागमधील मालमत्ता आठ वर्षे बेनामी पद्धतीने आपल्याकडे ठेवली. यात 19 बंगले असून 23 हजार स्केअर फूट एवढी जागा आहे. याची किंमत जवळपास साडेदहा कोटी एवढी असून उद्धव ठाकरे यांच्याकडून याची किंमत केवळ दोन कोटी दहा लाख एवढी सांगण्यात आली असल्याचा आरोप किरीट सोमैया यांनी केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी त्यांनी आयकर विभागाकडे मागणी केली आहे. अन्वय नाईक यांच्या कुटुंबाशी उद्धव ठाकरे यांचे संबंध होते हा आरोपही या आधी किरीट सोमैया यांच्याकडून करण्यात आला होता.
हेही वाचा -नागपूर : भाजयुमोतर्फे अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न
लक्ष विचलित करण्यासाठी भारतरत्नांची चौकशी
मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांची चौकशी ठाकरे सरकार करणार आल्याचा आरोप किरीट सोमैया यांनी केला आहे. शेतकरी आंदोलन संदर्भात ट्विट केल्याने ठाकरे सरकार ही कारवाई करत असल्याचं किरीट सोमैया यांनी सांगितले.