मुंबई- भाजपचे नेते किरीट सोमैय्या यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावर खोचक टीका केली आहे. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Former Mumbai Police Commissioner Sanjay Pandey ) यांंचे निकटवर्तीय असलेले मुबंईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांची आज ईडी कार्यालयात चौकशी ( ED office in Delhi ) होणार आहे. त्यावरून किरीट सोमैय्या यांनी संजय पांडे हाजीर हो, असे ट्विट केले आहे. संजय पांडे यांना ईडीने समन्स बजाविले होते. 30 जून रोजी मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन संजय पांडे निवृत्त झाले होते. त्यानंतर अवघ्या 3 दिवसांच्या आत त्यांना ईडीने नोटीस पाठविली होती.
किरीट सोमैय्या यांनी ट्विट करत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे, संजय पांडे हाजीर हो.. बेकायदेशीर फोन टॅपिंग 118 व्यक्तींचा घोटाळा..किरीट सोमैय्यांनी ट्विटमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ईडी संचालक व भाजपलाही टॅग केले आहे.
किरीट सोमैय्यांनी दुसरे ट्विट करत या घोटाळ्याचा २०१७ पासून पाठपुरावा करत असल्याचे म्हटले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी पाठपुरावा करणारे पत्रही जोडले आहे.
ईडीकडून संजय पांडे यांना नोटीस-संजय पांडे ज्यावेळी पोलीस महासंचालक होते तेव्हा त्यांनी परमबीर सिंह ( Parambir Singh ) यांना अनिल देशमुख यांच्याविरोधात माघार घेण्यासाठी दबाव निर्माण केला होता. तसेच एनएसई सर्वर कंप्रमाइज केस प्रकरणात त्यांना समन्स बजावण्यात ( NSE server compromise case ) आले होते. चित्रा रामकृष्णा प्रकरणात एक ऑडिट कंपनी तयार करण्यात आली होती. ही कंपनी संजय पांडे यांची होती. या दोन्ही प्रकरणी संजय पांडे यांना ईडीने नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकणात संजय पांडे यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे.