महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Kirit Somaiya On Shivsena Attack : शिवसेनेचा मला मारण्याचा हेतू होता; किरीट सोमैयांची प्रतिक्रिया - किरीट सोमैया शिवसेना हल्ला प्रतिक्रिया

पुणे महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यासाठी महापालिकेत गेलेल्या किरीट सोमैया ( Shivsainik Attack On Kirit Somaiya ) यांना शिवसैनिकांनी धक्काबुक्की केली व त्यात ते जखमी झाले. याबाबत बोलताना किरीट सोमैया यांनी ( Kirit Somaiya Spoke About Shivsena Attack ) शिवसेनेचा हेतू मला मारण्याचा होता, असे म्हटले आहे.

Kirit Somaiya Spoke About Shivsena Attack
Kirit Somaiya Spoke About Shivsena Attack

By

Published : Feb 8, 2022, 2:21 AM IST

Updated : Feb 8, 2022, 6:47 AM IST

मुंबई -पुणे महापालिकेच्या जम्बो कोविड रुग्णालयाच्या कामात भ्रष्टाचारासंदर्भात ( Pune Covid Hospital Scam ) पुणे महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यासाठी महापालिकेत गेलेल्या किरीट सोमैया ( Shivsainik Attack On Kirit Somaiya ) यांना शिवसैनिकांनी धक्काबुक्की केली व त्यात ते जखमी झाले. याबाबत बोलताना किरीट सोमैया यांनी ( Kirit Somaiya Spoke About Shivsena Attack ) शिवसेनेचा हेतू मला मारण्याचा होता व त्याबाबत त्यांनी ट्विटरवर एक
व्हिडिओ सुद्धा शेअर केला आहे. त्यामध्ये एक दगड त्यांना मारण्यासाठी उचलण्यात आला होता, असे दिसते.

किरीट सोामैयांचे ट्वीट

सोमैयांना झाली दुखापत -

भाजप नेते किरीट सोमैया ५ फेब्रुवारीला सायंकाळी साडेचारच्या सुमारास पुणे महापालिकेत आयुक्त विक्रमकुमार यांना निवेदन देण्यासाठी येणार होते. याची कुणकुण शिवसैनिकांना लागल्याने असंख्य शिवसैनिक महापालिकेत उपस्थित झाले होते. याप्रसंगी सोमैया यांना घेरण्याचा प्रयत्नात असलेल्या शिवसैनिकांकडून त्यांना धक्काबुक्की झाली. त्यामध्ये सोमैया पायरीवरून खाली पडल्याने जखमी झाले होते.

मला ठार मारण्याचा प्लान -

५ फेब्रुवारीला झालेल्या प्रकरणाचा एक व्हिडीओ किरीट सोमैया यांनी आज ट्विटरवर शेअर केला. या व्हिडिओमध्ये काही लोक त्यांच्या गाडीच्या मागे धावत असून एक व्यक्ती हातात दगड घेऊन त्यांच्या दिशेने भिरकावत आहे, असे दिसते. एकंदरीत या प्रकरणात शिवसैनिकांनी मला मारण्याचा प्लान तयार केला होता, असे सोमैया म्हणाले आहेत.

'सोमैया शांत बसणार नाहीत' -

पायाखालची वाळू सरकल्यावर माणूस बेफाम होतो. आपण काय करत आहोत, हे त्याला काहीच कळत नाही. मुद्दे संपले की माणूस गुद्यावर येतो. आम्ही बांगड्या भरल्या नाहीत, आमचा कायद्यावर विश्वास आहे. भावना गवळी यांच्या प्रकरणात किरीट सोमैया यांच्यावर यवतमाळमध्ये हल्ला झाला होता. आता पुण्यात झाला. पण सोमैया शांत बसणार नाहीत, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.

हेही वाचा -Nana Patole on PM Modi : 'काँग्रेस कोरोनाकाळात मदत करत होती तेव्हा मोदी टाळ्या-थाळ्या वाजवून मित्रांना देश विकत होते' - नाना पटोले

Last Updated : Feb 8, 2022, 6:47 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details