मुंबई- -राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंविरोधात एका महिलेने बलात्काराची तक्रार दिली. त्यावरून भाजप नेते किरीट सौमेय्या यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांवर बंगला लपवण्याचा आरोप करण्यात आला. तर दुसरीकडे त्यांच्या मंत्र्यांवर बायको लपवण्याचा आरोप केला जात आहे, अशी टीका सौमेय्या यांनी केली आहे.
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंविरोधात पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नसल्याचे महिलेने ट्विटमध्ये म्हटले होते. धनंजय मुंडे यांच्याविरोधात तरुणीने ओशिवरा पोलीस ठाण्यात 10 जानेवारीला तक्रार केली. याप्रकरणी 11 जानेवारीला रोजी मुंबई पोलिसांकडून अर्ज स्वीकारण्यात आला. 2006 पासून अत्याचार सुरू असल्याचा महिलेने तक्रारीत दावा केला आहे. त्यानंतर या सर्व प्रकरणावर धनंजय मुंडेंनीही फेसबुक पोस्ट करत खुलासा केला आहे.