मुंबईशिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांचे निकटवर्ती सुजित पाटकर यांच्यावर कोरोना परिस्थितीच्यावेळी कोविड सेंटर उभारण्यात घोटाळा केला असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमैया Kirit Somaiya यांनी केला होता. या वक्तव्याविरोधात फर्मने किरीट सोमय्या यांच्या विरोधात मानहानीची याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयाने असे म्हटले आहे की सुजित पाटकर यांच्या विरोधात आरोप करण्यापूर्वी वस्तुस्थिती पडताळून पाहायला पाहिजे होती.
सोमैया यांनी ठेवलेल्या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी दावा केला की फर्म केवळ कागदावर आहे. त्यामुळे यामध्ये निष्काळजीपणा झाला आहे. केवळ त्याच्यावर अवलंबून असलेल्या कागदपत्रांच्या आधारावर कोणतीही गृहितके असू शकत नाहीत. सुविधेचा समतोल देखील सोमय्या यांच्या बाजूने नाही. त्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान होणार नाही. याउलट एक जबाबदार व्यक्ती असल्याने सोमैया यांनी कोणत्याही प्रकारचे विधान करण्यापूर्वी वस्तुस्थितीची पूर्ण पडताळणी करायला हवी होती असे न्यायालयाने म्हटले आहे.
कोरोना जम्बो सेंटर प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर आणि इतरांविरुद्ध चौकशीची मागणी करणाऱ्या सोमैयांविरोधात रुग्णालयाने मानहानीचा दावा दाखल केला होता. कोरोना काळात या फर्मने पॅरा मेडिकल कर्मचारी, नर्सिंग कर्मचारी, आरोग्य सेवा व्यावसायिकांसाठी लॉजिस्टिकसह आरोग्य सेवा सुविधा पुरविल्या असे दाव्यात म्हटले आहे. मुंबई महापालिकेच्या कोरोना उपचार केंद्रांसाठी व्यवस्थापन सेवा देण्यासंदर्भात पालिकेने फर्मला कंत्राट दिले. सोमैयांनी या दाव्याला विरोध करत न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. तर सोमैयांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसची नोंदणीही करण्यात आली नव्हती. फर्मचे काही भागीदार राजकीय नेत्यांशी संबंधित असल्याने जम्बो सेंटरचे कंत्राट त्यांना दिले.