मुंबई :भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात खार पोलिसांनी ( Kirit Somaiya has Approached High Court to Quash FIR Filed ) दाखल केलेली एफआयआर रद्द करण्यात यावी याकरिता उच्च न्यायालयात सोमय्या यांनी धाव घेतली होती. या याचिकेवर आज सुनावणी करण्यात येणार आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती एस. एम. मोडक ( Justice Revathi Mohite Dere and Justice S M Modak Bench ) यांच्या खंडपीठाने याचिका निकाली काढत किरीट सोमय्या यांना झटका दिला ( Kirit Somaiya Reprimanded by High Court ) आहे. तसेच, असे निरीक्षण नोंदवले की, क्रिसमस यांनी दाखल केलेली याचिका ही राजकीय हेतूतून प्रेरित होती, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.
राज्य सरकारने बनावट एफआयआर दाखल केल्याची तक्रार :खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना हनुमान चालीसा प्रकरणानंतर कार पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यावेळी किरीट सोमय्या यांनी पोलीस स्टेशनला जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी शिवसेनिकांकडून त्यांच्यावर करण्यात आलेले आल्यानंतर पोलिसांनी सोमय्या यांच्या विरोधात एफआयआर दाखल केले होते. सोमय्या यांनी म्हटले आहे की, पोलिसांनी दाखल केलेली एफआयआर खोटी आहे. याविरोधात तक्रार करण्यासाठी किरीट सोमय्या खार पोलीस स्थानकात पोहोचले. त्या एफआयआरवर मी सही केलेली नाही. त्या एफआयआरवरील सही बनावट असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. राज्य सरकारने बनावट एफआयआर दाखल केली असून, सरकारची बनवाबनवी पकडली गेली आहे, असेही सोमय्या म्हणाले होते.
किरीट सोमय्या यांच्या वकिलाला न्यायालयाने फटकारले :भाजप नेते भाजप किरीट सोमय्या यांनी एफआयआरच्या तपशिलांमध्ये फेरफार केल्याचा आरोप केल्यानंतर मुंबई पोलिसांकडे पुरवणी जबाब नोंदवणार असल्याची माहिती शुक्रवारी माननीय उच्च न्यायालयाला दिली. आज न्यायालयात युक्तिवादादरम्यान सोमय्या यांच्या वकिलाकडून करण्यात आलेल्या मोठ्या आवाजातील युक्तिवादावर खंडपीठाने किरीट सोमय्या यांच्या वकिलाच्या युक्तिवादावर आक्षेप घेत म्हटले की, न्यायालयाला धमकावण्याचा प्रयत्न करू नका.
सोमय्यांच्या वकिलाकडून न्यायालयाची माफी :वकिलांनी आवाज उठवणे आम्हाला आवडत नाही. आम्ही घाबरणार नाही कोर्ट रूममध्ये कोणी आवाज चढून बोलणारे आम्हाला आवडत नाही. जर तुमच्याकडे चांगली केस असेल तर तुम्हाला आवाज उठवण्याची गरज नाही. काहीवेळा तुम्ही कोणासाठी हजर आहात यावर अवलंबून तुमचा आवाज वाढतो, अशा बाबत न्यायालयाकडून वकिलावर शुल्क आकारले जाते. याकरिता न्यायालयात शिस्त पाळली पाहिजे हे ध्यानात घ्या, अशा परखड भाषेत खंडपीठाने सोमय्या यांच्या वकिलांना खडसावले आहे. झालेल्या गैरसमजाबद्दल वकिलाने न्यायालयाकडे त्वरित माफी मागितली आहे.