महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Kirit Somaiya Reaction : ईडी कारवाई करणार असल्यामुळेच संजय राऊतांनी 55 लाख प्रवीण राऊतांना परत केले - किरीट सोमैया

आज ईडीने संजय राऊत यांच्याविरोधात मोठी कारवाई (ED Action on Sanjay Raut) केली आहे. यात राऊत यांची 11.15 कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. यावर भाजप नेते किरीट सोमैया (Kirit Somaiya) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ईडी आपल्यावर कारवाई करणार हे संजय राऊत (ED Action on Sanjay Raut) यांना दहा महिने आधीच कळाले होते, असे सोमैया म्हणाले.

By

Published : Apr 5, 2022, 5:08 PM IST

Updated : Apr 5, 2022, 5:16 PM IST

kirit somaiya
किरीट सोमैया

मुंबई - ईडी आपल्यावर कारवाई करणार हे संजय राऊत (ED Action on Sanjay Raut) यांना दहा महिने आधीच कळाले होते. म्हणूनच तातडीने त्यांनी 55 लाख रुपये प्रवीण राऊत (Pravin Raut) यांना परत केले आहेत. वर्षा राऊत (Varsha Raut) यांच्या खात्यातून प्रवीण राऊत यांच्या पत्नीच्या खात्यावर हे पैसे परत करण्यात आले होते, अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमैया (Kirit Somaiya) यांनी दिली आहे. आज ईडीने संजय राऊत यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. यात राऊत यांची 11.15 कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. सध्या यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.

भाजप नेते किरीट सोमैया

सोमैयांचे संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप - या प्रकरणात गेल्या दोन महिन्यांपासून ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली होती. या दिवसात सातत्याने ईडीच्या अधिकाऱ्यांवर, किरीट सोमैया आणि नील सोमैया यांच्यावर संजय राऊत आरोप करत होते. मात्र, संजय राऊत यांनी 1038 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. यामध्ये प्रवीण राऊत हे मुख्य आरोपी असून, त्यांच्या खात्यातून वर्षा राऊत यांच्या खात्यात पैसे गेले असल्याचा आरोप किरीट सोमैया यांनी केला आहे. आज संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर लगेच प्रदेश कार्यालयात किरीट सोमैया यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांच्यावर पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.

55 लाख परत करणे म्हणजे चोरीची कबुली - प्रवीण राऊत यांच्याकडून घेण्यात आलेले 55 लाख रुपये तातडीने संजय राऊत यांनी परत केले आहेत. याचाच अर्थ त्यांनी चोरीची कबुली दिली आहे. 55 लाख परत केल्यानंतरच त्यांची चौकशी होणे गरजेचे होते. मात्र, राज्य सरकारने तसे न करता संजय राऊत यांना पाठीशी घातले. याउलट ईडी अधिकाऱ्यांच्या विरोधात राज्य सरकारने एसआयटी स्थापन केली. ईडी अधिकाऱ्यांचे तोंड दाबता येईल असे राज्य सरकारला वाटले होते. मात्र, आता ईडीकडून आणखी कारवाई होणार, असा इशारा किरीट सोमैया यांनी दिला आहे. तसेच माफीया सरदारांना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे सरकारची धडपड सुरु असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

Last Updated : Apr 5, 2022, 5:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details