मुंबई - शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेतली होती. यात त्यांनी व्यावसायिक जितेंद्र नवलानी यांच्यावर ईडीची भीती दाखवून अनेक व्यापारी व बांधकाम व्यवसायिकांकडून पैसे उकळण्याचा व खंडणी वसुलीचा आरोप केला होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या प्रकरणाची चौकशी देखील सुरू झाली. मात्र, आता शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर काही तासातच नवलानी यांना क्लीनचिट मिळाली आहे. याच प्रकरणात सहआरोपी असलेले किरीट सोमैया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत निवासस्थानी बोलत ( Kirit Somaiya On Uddhav Thackeray ) होते.
हेही वाचा - Mumbai High Court: भाजप नेते किरीट सोमय्यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा
ही बोगस तक्रार हे निष्पन्न -यावेळी माध्यमांशी बोलताना भाजप नेते किरीट सोमैया म्हणाले की, "सगळ्यात पहिले उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ईडीची माफी मागितली पाहिजे. फेब्रुवारी महिन्यात संजय राऊत यांनी 15 पानी पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिले होते. यात त्यांनी म्हटले होते की, ईडीचे चार ऑफिसर आणि किरीट सोमैया हे नवलानी यांच्यामार्फत इथल्या व्यावसायिकांना धमक्या देतायेत आणि खंडणी वसूल करत आहेत. या प्रकरणाची यादी देखील चौकशी झाली. त्यावेळी यात ही तक्रार बोगस असल्याचे निष्पन्न झाले होते."