मुंबई -भाजप नेते किरीट सोमैया यांनी आता पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर हल्लाबोल ( Kirit Somaiya criticized on Thackeray Government ) केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या एका नवीन घोटाळ्या विषयी माहिती दिलेली आहे. याचा पाठपुरवठा करण्यासाठी लवकरच दिल्ली दरबारी जाणार असल्याचे किरीट सोमैया यांनी मुंबईत सांगितले आहे.
ठाकरे यांची घोटाळ्याची लंका लवकर जळणार -उद्धव ठाकरे यांना प्रत्येक क्षणी असे वाटते की त्यांच्या घोटाळ्याच्या लंकेला आता स्वतः हनुमान येऊन आग लावणार आहेत. उद्धव ठाकरे यांना भीती वाटणे स्वाभाविक आहे कारण त्यांचे मंत्री जेलमध्ये अनेक बेलवर आहेत. आता ठाकरे परिवाराची स्वतःची बेनामी संपत्ती जप्त व्हायला लागली आहे. त्यामुळे अस्वस्थता निर्माण झाली आहे. कोणत्याही क्षणी उद्धव ठाकरे यांची घोटाळ्याची लंका जळू शकते, असा आरोप किरीट सोमैया यांनी केला आहे. शिवसेनेचे उद्धव ठाकरे सोमैया यांना घाबरून दररोज उठून काहीतरी उटपटांग आरोप करत असतात. जर उद्या सकाळी उठल्यावर हे मैदान जिथे सभा झाली ते सोमैया यांची बेनामी संपत्ती आहे असे सांगून तुम्हाला जेलमध्ये टाकू शकतात, असे देवेंद्र फडणवीस यांनी काल सभेमध्ये सांगितले होते.
श्रीधर पाटणकर यांचा आणखी एक घोटाळा बाहेर काढणार! -आता बुस्टर सभेनंतर आग लावण्याचे काम केले जाणार आहे. उद्धव ठाकरे सरकारचे जे काही घोटाळे आहेत, त्या घोटाळ्यांना आग लावण्याचे काम करून घोटाळे बाजांवर कारवाई केली जाणार असल्याचं किरीट सोमैया यांनी सांगितले आहे. आता आम्ही सर्व भाजप नेते ॲक्शन मोडमध्ये गेलो आहोत असे सांगत आजही सकाळी मी दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी बोललो. श्रीधर पाटणकर, उद्धव ठाकरे यांचे मेहुणे यांच्या आणखी एका कंपनीच्या घोट्याल्या विषयी माहिती मी त्यांना दिली आहे. आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे व पाटणकर यांचा त्यात समावेश आहे. याचा पाठपुरावा करण्यासाठी मी गुरुवार व शुक्रवारी दिल्लीला जाणार आहे, असे सोमैया म्हणाले.
मुख्यमंत्री व पर्यटन मंत्री यांना पहाटेचे भोंगे ऐकायला येत नाहीत का? -भोंग्याबाबत सुप्रीम कोर्टाने अनेक महिने अगोदर निर्णय दिलेला आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे मुंबई मेट्रोची वाट लावण्यासाठी पर्यावरणची भाषा करत होते. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि पोलीस आयुक्त संजय पांडे यांना पहाटे चार वाजता जे भोंगे लागतात ते ऐकायला येत नाहीत का? रात्री दहाच्या नंतर गणेशोत्सवाचे लाऊडस्पीकर बंद केले जातात. परंतु, मशिदीवरील भोंगे याचा डेसिबल तुम्हाला ऐकायला येत नाही का? भारतीय जनता पक्षाच स्पष्ट मत आहे की, अधिकृत लाऊड स्पीकर मग ते मंदिर वर असतो, मस्जिदवर असोत इतर ठिकाणी असोत बंद व्हायलाच पाहिजेत, असही किरीट सोमैया यांनी सांगितल आहे.
हेही वाचा -Sanjay Raut on Devendra Fadnavis : हे लेच्या पेच्यांचे राज्य नाही - संजय राऊत