मुंबई - राज्यातील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी मुंबई महापालिकेतील पदाधिकाऱ्यांकडे मोर्चा वळविला आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव व मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार केल्याचा दावा भाजप नेते सोमैय्या यांनी केला. ते ईटीव्ही भारतशी बोलत होते.
यशवंत जाधव व परिवाराचा १५ कोटींचा भ्रष्टाचार?
स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव ( Standing chairperson Yashant Jadhav ) व त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांनी महापालिकेला लुटले आहे, असा आरोप भाजपचे खासदार किरीट सोमैय्या यांनी ( Kirit Somaiya on corruption in BMC ) केला आहे. ते म्हणाले, की माझ्याकडे पुरावे आहेत. प्रधान बिल्डर प्रायव्हेट लिमिटेडच्या खात्यात विविध ५ कंपन्यामार्फत १५ कोटी रुपये ट्रान्स्फर करण्यात आले. हे १५ कोटी रुपये प्रधान बिल्डरच्या खात्यातून जाधव यांच्या परिवाराच्या खात्यात ट्रान्स्फर करण्यात आले. या संबंधात सर्व विभागात आम्ही तक्रारी केल्या आहेत. लवकरच ईडीमार्फत त्यांची चौकशी करण्यात ( ED probe of Yashwant Jadhav ) येईल, असेही किरीट सोमैय्या यांनी म्हटले.
हेही वाचा-Khandoba Yatra canceled in Pali : पालीच्या खंडोबाची यात्रा कोरोनामुळे रद्द, भाविकांकरिता ऑनलाईन दर्शनाची सोय
पात्रता नसताना कंत्राट
पुढे सोमैय्या म्हणाले, की दुसऱ्या बाजूला महापौरांनी पात्रता नसलेल्या व्यक्तींना विविध टेंडर देऊन लूट लावली ( Kirit Somaiya on Mumbai Mayor corruption ) आहे. शिवसेनेचे नेते हीच त्यांची पात्रता, अशी व्याख्या आहे असेही ते म्हणाले. मंत्री आदित्य ठाकरेंनी वरळी कोवीड सेंटरचे कॉन्ट्रॅक्ट अशाच पद्धतीने दिले. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून तो लवकरच उघडकीस आणणार, असा दावा सोमैय्या यांनी केला आहे.
हेही वाचा-Mumbai Corona Pandemic to Endemic : मुंबईत लवकरच कोरोना संपणार; पालिका प्रशासनाने व्यक्त केला विश्वास
महापौरांकडून कोविड संदर्भात लोकांच्या मनामध्ये भीती
कोविड संदर्भामध्ये महापौर लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करत असल्याचा आरोप किरीट सोमैय्या यांनी लगावला आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेली रुग्ण संख्या कमी होत आहे. दिवसाला मुंबईत २० हजार रुग्ण सापडत असतील तर त्याच्यातील १९ हजार रुग्ण घरीच बरे होत आहेत. कोविडच्या नावावर लोकांच्या मनामध्ये विनाकार भीती निर्माण केली जात आहे. महापौरांनी भीती पसरवण्याऐवजी लोकांना याच्याविषयी जागृत करावे असेही ते म्हणाले.
सर्वपक्षीय २८ नेत्यांवर कारवाई सुरू-
आरोप लावण्यात आलेल्या सर्वपक्षीय अशा २८ नेत्यांवर कारवाई सुरू आहे असे सोमैय्या म्हणाले. यामध्ये आमदार अनिल देशमुख, आमदार अनिल परब, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार भावना गवळी व आमदार रवींद्र वायकर अशी अनेक नावे आहेत. या सर्वांवर कारवाई चालू आहे.
हेही वाचा-Lata Mangeshkar Corona Positive : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण
साताऱ्यात कोट्यवधी रुपयांचा चिटफंड घोटाळा!
साताऱ्यात अमेझ लाईफ ऑनलाईन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून लोकांची, गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा मोठा घोटाळा समोर आला आहे. कंपनीने लोकांची दिशाभूल करत त्यांच्याकडून दाम दुप्पट करायच्या योजनेमध्ये करोडो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप झाला आहे. याबाबत बोलताना किरीट सोमैय्या म्हणाले की ही कंपनी बोगस असून चिटफंड कंपनी आहे. यामध्ये सातारा, सांगली, कराड या भागातून लोकांनी करोडो रुपये गुंतवले आहेत. याबाबत गृहमंत्र्यांना पत्र दिले आहे. त्यांच्याकडून चौकशी होत असल्याचे त्यांना सांगण्यात आले आहे. परंतु यामध्ये गुंतलेले पैसे आता पूर्णपणे बुडाले आहेत. कदाचित वेळेवर ही गोष्ट समोर आल्याने लोकांना पैसे परत भेटण्याची आशाही आहे.