मुंबई - शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या साथीने भाजप सत्तेत आले आहे. दुसरीकडे भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना शुभेच्छा देताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर कठोर शब्दांत टीका केली होती. त्या वक्तव्यावर शिवसेनेमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. दुसरीकडे शिंदे गटामधील आमदारदेखील सोमैय्या यांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त करत आहेत.
भाजप नेते किरीट सोमैय्या हे नेहमीच शिवसेनेवर कडाडून टीका करतात. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुरुवारी भेट घेतली. त्यानंतर ट्विट करत माफिया मुख्यमंत्र्यांना हटवल्या बदल अभिनंदन, अशी जळजळीत टीका उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. तसेच माध्यमांशी बोलताना ही, उद्धव ठाकरे, अनिल परब, संजय राऊत आणि पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी केलेल्या कारभाराला माफियाराजच म्हणणार असे स्पष्ट केले.
आता ते चालतात का?सोमैय्यांच्या (Kirit Somaiya) टीकेला शिवसेनेच्या नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी ज्यांच्यावर आपण आरोप केले. आता त्यांच्यासोबत आपली युती झाली आहे. आता ते चालतात का? असा सवाल करत सोमैय्यांना प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही सोमय्यांना गांभिर्यांने घेत नाही, असे त्या म्हणाल्या. एकीकडे शिंदे गट आम्ही शिवसेना सोडली नाही. आजही आम्ही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आदर करतो मग सोमैय्यांनी केलेली टीका त्यांना चालते का?, असा सवाल उपस्थित केला.