मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत ( MP Sanjay Raut Press) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन थेट भाजप नेते किरीट सोमैया (Kirit Somaiya) आणि त्यांचे पुत्र नगरसेवक निल सोमैया (Neil Somaiya) यांच्यावर कडाडून टीका केली. पीएमसी बँक घोटाळ्याच्या मास्टरमाईड राकेश वाधवानशी सोमैया यांचे संबंध आहेत. सोमैयांचा मुलगा तर या मास्टरमाईडच्या कंपनीत डायरेक्टर आहे. त्यांनी निकॉन फेज वन आणि टू असे प्रकल्प उभे केले आहेत. त्यांना पर्यावरणाच्या परवानग्या नाहीत. आदित्य ठाकरेंना (aaditya thackeray) माझे आवाहन आहे की याची ताबडतोब चौकशी करून निल सोमैया आणि किरीट सोमैया यांना अटक करा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. तसेच पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाईंडच्या अकाऊंटमधून भाजपला 20 कोटींचा निधी गेला असल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.
- संजय राऊत यांनी केले गंभीर आरोप -
खासदार संजय राऊत म्हणाले की, पीएमसी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी राकेश वाधवान याला ब्लॅकमेल केले आणि त्याच्याकडून कोट्यवधीची जमीन घेतली. त्यांनी एक जमीन सात कोटी रुपयांना आणि वसई येथील 400 कोटी रुपयांची जमीन चार कोटी रुपयाला घेतली आहे. त्या जमिनीवर कंपनी आहे त्या कंपनीचा डायरेक्टर नील किरीट सोमैया आहे. निकॉन फेज वन आणि निकॉन फेज दोन हे हजारो कोटींचे प्रकल्प उभारले आहेत. त्याला पर्यावरण क्लिअरन्स नाही. या प्रकरणी कंपनीच्या सर्व परवानग्या रद्द करा.
- किरीट सोमैया दलाल असल्याचा आरोप