मुंबई राज्यात नाट्यमय सत्तातरानंतर महाविकास आघाडीची सत्ता गेल्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला एकामागोमाग एक दणके बसत आहेत. अशातच उद्धव ठाकरे यांचा उजवा हात समजले जाणारे संजय राऊत हे जेलमध्ये असून, त्यांच्या डावा हात असणारे अनिल परब यांच्यावर कारवाईची टांगती तलवार असताना आता उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय रवींद्र वायकर यांचाही एक घोटाळा भाजप नेते किरीट सोमैया Kirit Somaiya यांनी उघड केला आहे. 500 कोटींच्या या घोटाळा प्रकरणी रवींद्र वायकर यांच्यावर लवकरच कारवाई होईल, असे त्यांनी सांगितले आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काय आहे प्रकरण ? मुंबई जोगेश्वरी येथे 2 हजार वर्षांपूर्वीपासून महाकाली गुंफा आहे. दोन वर्षांपूर्वी 2020 मध्ये ही गुंफा व या गुंफेला जाणारा रस्ता यासाठी रवींद्र वायकर यांनी माफिया कॉन्ट्रॅक्टर व मुख्यमंत्री कार्यालयाची मदत घेऊन यासाठी 500 कोटीचे बिल्डर कन्स्ट्रक्शन अधिकार अविनाश भोसले यांना दिले, असा आरोप किरीट सोमैया Yakub Memon Grave Controversy यांनी केला आहे. अविनाश भोसले हे सध्या जेलमध्ये असून याप्रकरणी डेव्हलपमेंट राईट मिळवण्यासाठी शाहिद बालवा कंपनीने एप्लीकेशन केले व त्यास मंजुरी दिली. असे सोमैयांने सांगितले आहे. तसेच हा 500 कोटींचा मोठा घोटाळा असून लवकरच याची शहानिशा समोर येईल असे किरीट सोमैयां यांनी सांगितले आहे.