मुंबई - भाजपा नेते किरीट सोमैया (Kirit Somaiya on CM Uddhav Thackeray) यांची पुन्हा एकदा जीभ घसरल्याचे आज दिसून आले. सोमैया यांनी मंत्री अनिल परब यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्र्यांवरही टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 19 बंगल्यांबाबत थोतांड मांडले आहे. उद्धव ठाकरे यांच्यासारखा खोटारडा आणि लुच्चा मुख्यमंत्री पाहिला नाही, अशा शब्दात सोमैया यांनी टीका केली आहे.
अनिल परब तो मी नव्हेच -परिवहन मंत्री अनिल परब हे नौटंकी करत आहेत. ईडीने छापे मारल्यानंतरही आता तो मी नव्हेच या नाटकातील भूमिका ते करत आहेत. या नाटकातील कलावंत पनशीकर यांच्यानंतर आता परब यांना अभिनयाचे पारितोषिक दिले पाहिजे, अशा शब्दात किरीट सोमैया यांनी परब यांच्यावर टीका केली.