मुंबई - मुंबई महानगरपालिकेने (BMC) ब्लॅकलिस्ट केल्यानंतर ही ४ कोविड सेंटरचे (Covid Center Scam) काम देणं म्हणजे मानवी जिवाशी खेळणं आहे. मेडिकल इमर्जन्सीच्या नावाने असा भ्रष्टाचार आणि जिवाशी खेळ केल्याचं म्हणत लाइफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस कंपनी विरुद्ध किरीट सोमैया (Kirit Somaiya) यांनी एस्प्लनेड कोर्टात तक्रार दाखल केली आहे. यावेळी आतापर्यंत आघाडी सरकारामधील १२ जणांनी घोटाळे केले त्यापैकी २ जण जेलमध्ये गेले, इतरही लवकरच जेलमध्ये जाणार. उद्धव ठाकरेंची (CM Uddhav Thackeray) माफिया सेना मुंबई लुटत आहेत. त्यांना उत्तर द्यावेच लागेल असे सोमैया यांनी म्हटले आहे.
काय आहेत सोमैयांचे आरोप? -मुंबई महानगरपालिकेने कोणत्याही प्रकारच्या टेंडरची पारदर्शक प्रक्रिया न करता एका "फर्जी" बोगस कंपनीला मुंबईतल्या अनेक कोविड सेंटरचे कॉन्टॅक्ट दिले असा आरोप करत सुजित पाटकर यांच्या लाइफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस या कंपनीने आपले पार्टनरशिप रजिस्ट्रेशन २६ जून २०२० ला झाले असल्याचे भासवले पण जे पार्टनरशिप डिड आणि बाकी कागदपत्र दिले ते फर्जी होते, बोगस होते असं किरीट सोमय्यांनी म्हटलंय. एक अशी कंपनी जी रजिस्टर झालेली नाही. ज्यांच्याकडे मनुष्यबळ नाही, कार्यालय नाही, अनुभव नाही अशा बोगस कंपन्यांना कोविङ सेंटर चालवण्याचे कॉन्ट्राक्ट देणं, आयसीयु युनिटचे कॉन्ट्राक्ट देणं म्हणजे हजारो कोविड़ रुग्णाच्या जिवाशी खेळण्याचे काम लाइफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस कंपनी आणि मुंबई महानगरपालिकेने केलाय असा आरोप देखील किरीट सोमय्या यांचा आहे. या कंपनीला पुणे महानगरपालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने ब्लॅकलिस्ट केल्याची गोष्ट त्यांनी लपवली. आणि मुंबई महानगरपालिकेने ब्लॅकलिस्ट झाल्यानंतर ही ४ कोविड सेंटरचे काम देणं म्हणजे मानवी जिवाशी खेळणं आहे. मेडिकल इमर्जन्सीच्या नावाने असा भ्रष्टाचार आणि जिवाशी खेळ केल्याचं म्हणत लाइफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस कंपनी विरुद्ध किरीट सोमय्या यांनी एस्प्लनेड कोर्टात तक्रार केल्याचे सांगितले.