मुंबई -मुंबई महापालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराबाबत भाजप नेते किरीट सोमैया वारंवार मुंबई महापौर किशोरी पेडणेकर ( kirit somaiya allegations on Kishori Pednekar ) व स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर आरोप करत आलेले आहेत. परंतु, आता मुंबई कोविड सेंटर येथील भ्रष्टाचार उघड करत, पैसे कशाप्रकारे मुंबई महापौरांच्या नातेवाईकांच्या खात्यात जमा झाले आहेत, याबाबतचे पुरावे सोमैया यांनी सादर केले.
माहिती देताना भाजप नेते किरीट सोमैया हेही वाचा -Father arrested for selling baby : बाळाची वडिलांकडून विक्री;11 जणांना केली अटक
क्रिश कॉर्पोरेटला १.९७ कोटींचे पेमेंट
मुंबई महापालिकेचे कोविड केंद्र शिवसेना नेत्यांच्या कमाईचे साधनाचा एक पुरावा आज भाजपा नेते किरीट सोमैय्या यांनी सादर केला. क्रिश कॉर्पोरेट सर्विसेस इंडिया प्रा. लि. कंपनीला गेल्या काही महिन्यांत मुंबई महापालिकेने कोविड केंद्र व कोविड संबंधी सुविधांचा पुरवठा करण्यासाठी २७ वेगवेगळे ऑर्डर्स व १.९७ कोटींचे पेमेंट केल्याचे पुरावे आज किरीट सोमैया यांनी सादर केले. अशाच पद्धतीने मुंबईतल्या आणखीन एका कोविड केंद्रासंबंधी एका 'बेनामी कंपनीला' १२ कोटी रुपयांचे पेमेंट मुंबई महापालिकेने केले आहे. या संबंधीचे अधिक पेमेंट व अधिक पुरावे पुढच्या आठवड्यात आपण देणार असल्याचे सोमैया ( kirit somaiya allegations on Kishori Pednekar ) यांनी सांगितले.
महापौरांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे
महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी मला गांजाडीया व ज्या शिवीगाळ करायच्या असतील त्या कराव्या. परंतु, कोट्यवधी रुपयांचे कोविड केंद्राचे पेमेंट स्वत: व परिवाराच्या कंपनीत मिळाले त्या संबंधी स्पष्टता आधी करावी, असे आवाहन सोमैया यांनी केले. महापौरांनी मुंबई महापालिकेचा पैसा स्वत:च्या कंपनीत टाकला, हे मुंबईकरांसाठी शर्मेची बाब असल्याचे सुद्धा किरीट सोमैया यांनी सांगितले.
हेही वाचा -Nawab Malik On Up Election 2022 : राष्ट्रवादी आणि सपाची युतीबाबत बोलणी पूर्ण; नवाब मलिक