महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

एनपीआर कायद्यामुळे आमची मुलं ठार मरतील हो !; वेश्या अन्याय मुक्ती परिषदेच्या अध्यक्षांचा टाहो - एनपीआर

एनपीआर या कायद्याची अंमबजावणी झाली तर आम्ही कुठून पुरावे आणणार, आमच्या मुलाचा बाप कुठे आहे? आणि आम्ही कुठल्या बापाचं नाव लावू ? असा सवाल करत राज्यात एनपीआर लागू झाला तर आमची मुलं ठार मारतील हो! असा टाहो वेश्या अन्याय मुक्ती परिषदेच्या किरणताई देशमुख यांनी सोमवारी मुंबईत माध्यमांपुढे फोडला.

वेश्या अन्याय मुक्ती परिषदेच्या किरणताई देशमुख
वेश्या अन्याय मुक्ती परिषदेच्या किरणताई देशमुख

By

Published : Feb 18, 2020, 2:54 AM IST

मुंबई - मे महिन्यात एनपीआर या कायद्याची अंमबजावणी झाली तर आम्ही कुठून पुरावे आणणार, आमच्या मुलाचा बाप कुठे आहे? आणि आम्ही कुठल्या बापाचं नाव लावू ? असा सवाल करत राज्यात एनपीआर लागू झाला तर आमची मुलं ठार मारतील हो! असा टाहो वेश्या अन्याय मुक्ती परिषदेच्या किरणताई देशमुख यांनी सोमवारी मुंबईत माध्यमांपुढे फोडला. सरकारला हात जोडून कळकळीची विनंती करत राज्यात एनपीआर लागू करू नये, अशीही मागणी त्यांनी केली.

एनपीआर कायद्यामुळे आमची मुलं ठार मरतील हो

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची राज्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या २१ महिला संघटनेच्या प्रतिनिधींनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे भेट घेतली. आपल्या व्यथा सांगत राज्यात एनपीआर हा कायदा लागू करू नये अशी मागणी केली. त्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधी समोर आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी किरणताई देशमुख म्हणाल्या, माझ्यासारख्या अनेक महिला त्यांच्या घरी जाऊ शकत नाहीत. आपली ओळख देऊ शकत नाही. आम्हाला एकदा बाहेर पडल्यावर नंतर लोक स्वीकारत नाहीत, त्यामुळे आम्ही कुठून कागदपत्रे आणणार. देशभरातून ज्या महिला स्थलांतर होऊन आलेल्या आहेत त्यांची अवस्था दयनीय असते. एनपीआर कायदा आला तर आम्ही कुठून कागदपत्रे देणार, आमच्या मुलाचा बाप कुठे आहे? आम्ही त्यांना कुठल्या बापाचं नाव लावू ? साधी सरकारी कागदपत्रे नाहीत आणि तुम्ही सत्तर सालाचे पुरावे मागत असाल तर आम्ही कुठून देणार? असा सवाल करत त्यांनी केला. त्याचप्रमाणे पुढे आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाल्या की, आम्हाला साधा जातीचा दाखला मिळत नाही, मग आम्ही सगळी कागदपत्रे कुठून आणणार त्यामुळे सरकारने एनपीआर कायदा लागू करू नये, अशी आमची हात जोडून असल्याचे किरणताई देशमुख म्हणाल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details