मुंबई :वर्सोवा ( Varsova Murder Case ) येथील बस डेपोजवळ 22 जुलै रोजी सूरज तिवारी 24 वर्षीय तरुणाची पेव्हर ब्लॉकने हल्ला करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात वर्सोवा पोलिसांनी ( Varsova Police ) मृत तरुणाचा आरोपी मित्र मोनुकुमार शिवनारायण सिंह याला अटक केली आहे. मित्रासोबत झालेल्या क्षुल्लक कारणावरील वादातून हत्या ( Killing to friend over petty argument ) झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
डोक्यावर वार करून हत्या-पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई येथे बस डेपोच्या आवारात 24 जुलै रोजी सकाळी एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला. ही माहिती मिळताच पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी पोहचले. यावेळी पोलिसांना एका तरुणाचा मृतदेह आढळला. मृतदेहाचे बारकाईने निरक्षण केले असता मृत इसमाच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाल्याने व्यक्तीची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आजूबाजुच्या परिसरामध्ये चौकशी केली असता मृत तरुणाचे नाव सूरज मनोज तिवारी असल्याचे कळले.
आरोपीस शिताफीने अटक-पोलिसांच्या माहितीनुसार, मृत सूरज तिवारी हा सुमारे दिड वर्षांपूर्वी दिल्लीवरुन मुंबईत आला होता. त्याला नोकरी धंदा नसल्याने तो सातबंगला अंधेरी पश्चिम मुंबई परिसरातच गुरुदवारामधील लंगर किंवा इतर मोफत जेवण मिळणाऱ्या ठिकाणी जावून जेवत असे आणि फुटपाय अथवा बी.एस.टी बस डेपोच्या आवारात झोपत असे. त्याला दारू आणि गांजाचे व्यसन होते. पोलिसांनी त्याच्यासोबत असणाऱ्या साथीदारांकडे अधिक चौकशी केली असता मोनूनावाच्या साथीदाराने त्याचा खून केला असल्याचे आणि तो पळून गेला असल्याचे निष्पन्न झाले. तसेच मोनू हा काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी आला होता. त्यामुळे त्याचे पूर्ण नाव अथवा त्याचा पत्ता कोणालाही माहीत नव्हता. मोनूलाही गांजाचे व्यसन होते. पोलिसांनी वेगवेगळे चार पोलीस पथके तयार केली आणि मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेतला. आरोपी मोनुकुमार शिवनारायण सिंह याला वर्सोवा पोलीस ठाणेच्या पोलीस पथकाने सापळा लावून शिताफीने पकडले.
हेही वाचा-Nilesh Rane :दीपक केसरकरांनी आपल्या औकातीत रहावं, अन्यथा...; निलेश राणेंचा थेट इशारा